छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) नक्षलवादी (Naxal) आणि सैन्याच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ITBPचे जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांकडून हल्ला झाला असुन, या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर असलेल्या एका ठीकाणी सैनिकांवर हा हल्ला केला. यानंतर जवानांकडे असलेल्या एके -47 रायफल, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वॉकी टॉकी घेऊन हे नक्षलवादी पळून गेले.
बस्तरचे आय.जी. सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार शहीद झालेले सैनिक आयटीबीपीच्या 45 व्या बटालियनच्या ई कंपनीचे सैनिक होते.
चार दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना अटक केली होती. याचाच बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केली असल्याचे समजते आहे. सुरक्षा दलांनी दंतेवाडाच्या कुआकोंडा पोलीस स्टेशन परिसरातून तीन नक्षलवादी अटक केले होते, ज्यामध्ये हंगा कर्टम (25), आयता माडवी (25) आणि पोज्जा उर्फ लाठी कर्तम (28) या तिघांचा समावेश होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कुआकोंडा पोलीस स्टेशनमधून बडेगुद्रा आणि अतेपाल गावांच्या दिशेने पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. जेव्हा टीम अतेपाल गावाजवळ जंगलात होती, तेव्हा तीन संशयित पळून जाताना दिसले. पोलिसांच्या पथकाने घेराव घातला आणि या त्यांना पकडले. आणि याच तिघांना ताब्यात अटक केल्याच्या बदल्यात नक्षलवाद्यांनी ही कारवाई केल्याचे समजते आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.