Gujarati New Year 2022: पंतप्रधान मोदींसह अनेक राजकिय नेत्यांनी दिल्या गुजराती बाधंवांना नववर्षाच्या शुभेच्छा!

गुजराती नववर्ष 2022 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
Gujarati New Year 2022
Gujarati New Year 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती नववर्षानिमित्त (Gujarati New Year) गुजरातच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी (PM Modi) गुजरातीमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, सर्व गुजरातींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आजपासून सुरू होणारे नवीन वर्ष तुमच्या जीवनात प्रकाश टाकणारे आणि तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जावो.

  • पंतप्रधान मोदींनी गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, नवीन संकल्प, नवीन प्रेरणा आणि नवीन उद्दिष्टांसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा, या आकांक्षेने गुजरात (Gujrat) नेहमीच यशाच्या शिखरांना स्पर्श करेल.

Gujarati New Year 2022
Kashmir पासून ते बंगालपर्यंत दिवाळीत आगीने केला कहर
  • नवीन वर्ष आयुष्यात आनंदाचे जावो - अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही गुजरातच्या जनतेला गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट (Twitter) करत लिहिले, माझ्या सर्व बंधू-भगिनींना गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.

  • राहुल गांधींनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, माझ्या सर्व गुजरातमधील बंधू-भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुख, शांती आणि भरभराटीचे जावो आणि गुजरातला प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर ठेवो.

  • गुजराती नववर्ष कार्तिक महिन्यात साजरे केले जाते

गुजराती नववर्ष कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. गुजराती नववर्षाचा दिवस हा गुजरातच्या लोकांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. गुजराती विक्रम संवत कॅलेंडरनुसार गुजरातमध्ये नवीन वर्षाची सुरुवात दिवाळीनंतर (Diwali) होते. गुजरातचे लोक 'साल मुबारक' आणि 'नूतन वर्ष अभिनंदन' म्हणत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com