तिरंगा देशाच्या वस्त्रोद्योग, खादी आणि स्वावलंबनाचे प्रतीक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. सुरतने या प्रदेशात आत्मनिर्भर भारताचा पाया घातला आहे. महात्मा गांधी यांच्या रूपाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व गुजरातने केले. देशाला लोहपुरुष सरदार पटेल यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व दिले.
पीएम मोदी म्हणाले, "बार्डोली सत्याग्रह आणि दांडी यात्रेने दिलेल्या संदेशाने संपूर्ण देश एकजूट केला होता. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तिरंग्यात देशाचे भविष्य पाहिले होते. त्यांनी कधीही तो झुकू दिला नाही. त्यानंतर नव्या भारताच्या (India) प्रवासाला सुरुवात केली. 75 वर्षांनंतर, तिरंगा पुन्हा एकदा भारताची एकता आणि चेतना प्रतिबिंबित करत आहे. गुजरातचा प्रत्येक कोपरा उत्साहाने भरला आहे आणि सुरतने त्याचे वैभव वाढवले आहे."
* तिरंगा यात्रेत छोटा भारत
सुरतच्या (Surat) तिरंगा यात्रेचा उल्लेख करून ते म्हणाले की, या यात्रेत लघु भारताचे दर्शन घडते. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग आहे. कपडे विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, कोणी कारागीर आहेत, कोणी शिवणकाम, भरतकाम, तर कोणी वाहतूक किंवा दागिन्यांच्या कामात गुंतलेले आहेत. संपूर्ण वस्त्रोद्योग आणि सुरतच्या लोकांनी हा कार्यक्रम भव्यदिव्य केला आहे.
* 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या ताकदीचे आणि समर्पणाचे प्रतीक
देशभरात निघणारी तिरंगा यात्रा ही 'हर घर तिरंगा अभियाना' (Har Ghar Tiranga) च्या ताकदीचे आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतातील प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जाईल. समाजातील प्रत्येक वर्गातील, प्रत्येक जाती-वर्णातील लोक समान अस्मिता घेऊन उत्स्फूर्तपणे येत आहेत. हे भारताच्या निष्ठावान नागरिकाचे वैशिष्ट्य आहे. या मोहिमेत महिला आणि पुरुष, तरुण, वृद्ध आणि इतर सर्वजण आपापली भूमिका बजावत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.