इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने केंद्रीय कर्मचार्यांना ऑफिसमधील कम्प्युटरवर गेम, चित्रपट तसेच इतर मनोरंजन साइट उघडू किंवा डाउनलोड करू नका असा सल्ला दिला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती सोशल मीडिया आणि इतर नेटवर्किंग साइट्सवर शेअर करण्यावर मर्यादा घालण्यासही सांगण्यात आले आहे. देशातील 80 कोटीहून अधिक डिझिटल नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता मंत्रालयाने असे आदेश काढले आहे.
Cert सायबर सुरक्षा नियम सेट करते
सरकारकडे विविध स्वरूपात लोकांची डिझिटल माहिती असते. तो डिझिटल डेटा सरकारी विभागाच्या कम्प्युटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक सिस्टमला हॅक करून मिळवता येतो. या प्रकारच्या हॅकिंगपासून संरक्षण करण्यासाठी, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT), आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा नियम निश्चित केले आहेत.
मंत्रालयाचे म्हणणे आहे की शिक्षण, आरोग्य, बँकिंग यासारखी विविध क्षेत्रे डिझिटल झाली आहेत. 2025 पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. CERT नुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी चौकशी केल्यानंतरच सोशल मीडियावर फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकारावी.
केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पासवर्ड बदलत रहावे
केद्रिय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर सरकारी कागदपत्रे किंवा कोणत्याही प्रकारची सरकारी माहिती पोस्ट किंवा शेअर करू नये. यामुळे सोशल मीडियावर आपला अधिकृत ईमेल आयडी देखील शेअर करू नये. तुम्ही तुमचा पासवर्ड दर ४ महिन्यांच्या अतंराने बदलावा. तसेच जूना पासवर्ड परत ठेऊ नका. सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये नेहमी वायफाय, ब्लूटूथ चालू ठेवू नये. कर्मचार्यांनी केवळ Google Play Store सारख्या अधिकृत स्टोअरमधून अॅप डाउनलोड करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.