PM मोदी आज हिमाचल प्रदेशातील उना अन् चंबाला देणार भेट

PM Modi Visit Himachal Pradesh: उनामध्ये पंतप्रधान मोदी उना हिमाचल रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
PM Modi Visit Himachal Pradesh
PM Modi Visit Himachal PradeshDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल (Himachal Pradesh) प्रदेश दौऱ्यावर आहेत. उना येथे पतंप्रधान मोदी उना हिमाचल रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर, एका सार्वजनिक कार्यक्रमात ते आयआयआयटी उना राष्ट्राला समर्पित करतील आणि उनामध्ये बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील. त्यानंतर, चंबा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)-III लाँच करतील.

  • औषधनिर्मिती क्षेत्रात स्वावलंबन आणण्यासाठी पंतप्रधान मोदी उना जिल्ह्यातील हरोली येथे बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करणार आहेत. जे 1900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले जाणार आहे. पार्क API आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करेल आणि 20,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे या भागातील आर्थिक क्रियाकलापांनाही चालना मिळेल.

  • पंतप्रधान भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) उना राष्ट्राला समर्पित करतील. त्याची पायाभरणी पंतप्रधानांनी 2017 मध्ये केली होती. सध्या या संस्थेत 530 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

  • पंतप्रधान नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. अंब अंदौरा ते नवी दिल्ली अशी देशात सुरू होणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन असेल आणि ती पूर्वीच्या तुलनेत सुधारित आवृत्ती आहे, जी खूपच हलकी आहे आणि कमी कालावधीत उच्च गती गाठण्यास सक्षम आहे. ते फक्त 52 सेकंदात 100 किमी/ताशी वेग वाढवते.

PM Modi Visit Himachal Pradesh
Jammu-Kashmir: जम्मूतील 'बाहेरील' मतदारावर मोठा निर्णय

चंबामध्ये पंतप्रधान या भेटवस्तू देणार आहेत

  • पंतप्रधान दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील- 48 मेगावॅट चांजू-III जलविद्युत प्रकल्प आणि 30 मेगावॅटचा देवथल चांजू जलविद्युत प्रकल्प. या दोन्ही प्रकल्पांतून दरवर्षी 270 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होईल आणि हिमाचल प्रदेशला या प्रकल्पांमधून सुमारे 110 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

  • राज्यातील सुमारे 3,125 किमी लांबीचे रस्ते सुधारण्यासाठी पंतप्रधान हिमाचल प्रदेशमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)-III लाँच करतील. केंद्र सरकारने राज्यातील 15 सीमावर्ती आणि दुर्गम भागातील 440 किमी रस्त्यांच्या अद्ययावतीकरणासाठी 420 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे.

पंतप्रधानांचे पूर्ण वेळापत्रक

  • पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर सकाळी 9 वाजता उनाच्या पोलीस लाईन झालेदा येथे उतरणार आहे.

  • वंदे भारत एक्स्प्रेसला उना रेल्वे स्थानकावरून सकाळी 9.15 वाजता हिरवा झेंडा दाखविला जाईल.

  • सकाळी 9.45 वाजता ते उनाच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर पोहोचतील. येथे पंतप्रधान मोदी प्रथम बल्क ड्रग पार्क, हरोली, उना-हमीरपूर नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी करतील.

  • सकाळी 10.50 वाजता झालेदा येथून चंबाकडे प्रयाण होईल.

  • सकाळी 11.45 वाजता ते चंबा येथील सुलतानपूर हेलिपॅडवरून चौगन मैदानासाठी रवाना होतील.

  • दुपारी 12 वाजता ते चौघन येथील अनेक प्रकल्पांच्या पायाभरणीचे उद्घाटन करतील. येथे ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.

  • दुपारी 1:05 वाजता चंबाकडे प्रस्थान. पठाणकोटमार्गे ते दिल्लीला येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com