Dhirendra Shastri: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा वाद काही दिवसांपासून सुरु आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्काराच्या दाव्याला अंनिसच्या श्याममानव यांनी आवाहन दिले होते. याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिस ठाण्यात धीरेंद्र शास्त्रीविरोधात अंधश्रद्धा पसरवण्याबाबत गुन्हा दाखल केला होता.
आता नागपूर पोलीसां( Police)नी सहा तासांचा व्हिडिओ तपासून यात अंधश्रद्धा पसरवण्यासारखं काही नाही,असं म्हणत धीरेंद्र शास्त्रींना क्लीन चीट दिली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात धीरेंद्र शास्त्रींचा राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
बाबा धीरेंद्र शास्त्री त्यांच्या चमत्काराच्या दाव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कोणत्याही व्यक्तीची माहीती ते सांगू शकतात. त्याचबरोबर, एखाद्या न पाहिलेल्या रुममधील वस्तू न पाहता सांगू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. अंनिसच्या श्याममानव यांनी त्यांना आव्हान दिले आहे.
मी सांगितलेल्या जागी, तिथल्या लोकांबरोबर धीरेंद्र शास्त्रींनी हा प्रयोग करुन दाखवावा ९० टक्के जरी ते बरोबर ओळखू शकले तर मी धीरेंद्र शास्त्रींच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागेन. अंनिसची ही चळवळ बंद करेन असे श्याम मानव यांनी म्हटले आहे.
माझा शिष्य चारित्र्यहीन नाही तर हा एक चमत्कार आहे. असे म्हणत धीरेंद्र शास्त्रीचे गुरु रामभद्राचार्यांनी धीरेंद्र शास्त्रींना आपला पाठिंबा दर्शवला आहे. माझा शिष्य परंपरेतून मिळालेल्या प्रसादाचं वाटप करत आहे. श्याममानव यांनी अंधश्रद्धेची केलेली तक्रार चुकीची आहे.
अजमेर शरीफवर जेव्हा चादर चढवली जाते तेव्हा ती अंधश्रद्धा नाही का ? पाखंडी जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतात तेव्हा ती अंधश्रद्धा नाही का ? हे सत्य आहे, अंधश्रद्धा नाही. तसेच रामभद्राचार्यांनी चुकीच्या धमक्या देणाऱ्या आणि आरोप करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी असेही म्हटले होते.
आता नागपूर( Nagpur ) पोलीसांनी धीरेंद्र शास्त्रींना क्लिन चीट दिल्यानंतर हा वाद थांबणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर, आता नागपूर पोलीसांच्या या निर्णयानंतर श्याममानव यांची प्रतिक्रिया काय असणार आहे, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.