Bilkis Bano: बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील 11 दोषींची सुटका झाल्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आले आहे. मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. गुजरात सरकारने घटनात्मक अधिकारांतर्गत या दोषींची सुटका केली. यातच आता संगीतकार रब्बी शेरगिल यांनी बिल्किस बानोला असुरक्षित वाटत असल्यास पंजाबमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही तुमचे रक्षण करु, असे ते म्हणाले आहेत. रब्बी शेरगिल यांनी यापूर्वी बिल्किसबद्दल एक गाणे गायले होते, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते.
दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान शेरगिल म्हणाले, 'सरदार तुमचे रक्षण करतील. मला व्यक्तिश: त्यांना मिठी मारुन सांगावेसे वाटते की, तुमची वेदना हीच आमची वेदना आहे. तुम्ही एकट्या नाहीत.' शेरगिल पुढे म्हणाले, 'माझा प्रत्येकाला एकच संदेश आहे की, न्यायाकडे लक्ष द्या.'
दुसरीकडे, देशात नैतिकतेचा अभाव असल्याचेही ते म्हणाले. 'देशात नेतृत्वाचा अभाव आहे. यासाठी आपल्या पिढीला आणि माध्यमांना पुढे यावे लागणार आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना, गुजरात (Gujarat) दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्या सामूहिक बलात्कार आणि कौटुंबिक हत्येतील दोषींना सरकारने मुक्त केले. या सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ते गोध्रा कारागृहात बंद होते,' असेही ते शेवटी म्हणाले.
तसेच, सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. 2008 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपींना (Accused) जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अपील केले होते. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.