हातावरच्या टॅटूमुळे लागला खुनाचा तपास

मृतदेह कुजल्यामुळे त्याची ओळख पटू शकत नव्हती, मात्र मृतदेहाच्या उजव्या हातावर "नवीन" लिहिलेला टॅटू आढळला आणि तपासाचा गुंता सुटला
Crime Scene
Crime SceneDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीतील (Delhi) अंध व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना (Delhi Police) यश आले आहे. या प्रकरणात पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरीरावरच्या एका टॅटुमूळे या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याच व्यक्तीच्या पत्नीसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण पूर्व दिल्लीचे डीसीपी आरपी मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी न्यू फ्रेंड्स कॉलनीतील सुखदेव विहाराजवळील नाल्यात काळ्या रंगाची ट्रॉली बॅग सापडल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा ट्रॉली बॅग उघडली तेव्हा बॅगमध्ये सुमारे 25-27 वर्षांच्या व्यक्तीचा विकृत अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेह कुजल्यामुळे त्याची ओळख पटू शकत नव्हती. मात्र मृतदेहाच्या उजव्या हातावर "नवीन" लिहिलेला टॅटू आढळला. त्या व्यक्तीने उजव्या हातात स्टीलचे कडं सुद्धा घातले होते. चौकशी केली असता असे आढळून आले की, त्याची हत्या करुन मृतदेह नाल्यात आणून टाकण्यात आला होता

Crime Scene
Video: चोरीच्या संशयातून ट्रकमागे बांधून फरपटत नेले; आदिवासी तरुणाचा मृत्यू

टॅटूद्वारे पोलिसांना मृत व्यक्ती हा 24 वर्षीय नवीन असल्याचे समजले. देवळी गावातील त्याचीच पत्नी मुस्कानने नेब सराई पोलीस ठाण्यात आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले होते की नवीन 8 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. अधिक तपासासाठी, पोलिसांनी दिल्ली देवळी गावात दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पण मुस्कान तिथे सापडली नाही. जेव्हा पोलीस पथकाने तपास केला, तेव्हा असे दिसून आले की तिने काही दिवसांपूर्वी भाड्याने राहत असलेली खोली सोडून पळ काढला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com