
मोटोरोलाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटोरोला एज ६० लाँच केला आहे, जो एज ६० मालिकेतील नवीनतम मॉडेल आहे. या फोनमध्ये ६.६७-इंचाचा १.५K क्वाड-कर्व्हड पीओएलईडी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४५०० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. या मोबाईलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रोसेसरसह मोटो एआय फीचर्स देखील आहेत.
Motorola Edge 60 ची भारतात किंमत 25,999 रुपये आहे आणि ती फक्त एकाच प्रकारात येते, ज्यामध्ये 12GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते. हा दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, Pantone Gibraltar Sea आणि Pantone Shamrock या रंगांमध्ये हा फोन उपलब्द आहे. फोनची विक्री 17 जूनपासून Flipkart, motorola.in आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सुरू होईल. लाँच ऑफर म्हणून, Axis Bank आणि IDFC Bank क्रेडिट कार्ड वापरकर्ते 1,000 रुपयांची त्वरित सूट मिळवू शकतात.
Motorola Edge 60 Android 15 वर चालतो आणि कंपनीच्या मते, 4 वर्षांसाठी 3 प्रमुख OS अपडेट्स आणि सुरक्षा पॅच मिळतील. फोनला 6.67-इंच 1.5K pOLED स्क्रीन मिळते, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 10-बिट कलर सपोर्ट समाविष्ट आहे.
डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 7i ने संरक्षित आहे. या डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे आणि 12GB LPDDR4X रॅमसह येतो. यात 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा प्रायमरी सेन्सर (Sony LYTIA 700C) आहे जो OIS सपोर्टसह येतो. दुसरा सेन्सर 50MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे जो मॅक्रो शूटिंगला देखील सपोर्ट करतो.
तिसरा कॅमेरा 10MP चा टेलिफोटो लेन्स आहे, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल झूम, OIS आणि 30x सुपर झूम समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो 4K 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
Motorola Edge 60 मध्ये 5500mAh ची बॅटरी आहे जी 68W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की चार्जर देखील बॉक्समध्ये समाविष्ट आहे. बॅटरी बॅकअपबद्दल, असा दावा केला जातो की तो दैनंदिन वापरात बराच काळ टिकण्यास सक्षम आहे, जरी स्टँडबाय किंवा स्क्रीन-टाइमबद्दल कोणताही दावा केलेला नाही.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, फोनमध्ये 5G (SA / NSA), ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB टाइप-C सारखी वैशिष्ट्ये आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.