पोरासाठी आई काहीही करू शकते! रेल्वे स्टेशनवर दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतणाऱ्या माऊलीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video of women who fall from train: "ट्रेन सुरू झाल्यावर डब्यात चढण्याचा प्रयत्न करू नका," अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दिली जाते.
Viral Video of women who fall from train
Viral Video of women who fall from trainDainik Gomantak
Published on
Updated on

"ट्रेन सुरू झाल्यावर डब्यात चढण्याचा प्रयत्न करू नका," अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दिली जाते. मात्र, कधी प्रवाशांचा निष्काळजीपणा तर कधी एखादी हतबलता जिवावर बेतते. आग्रा कॅंट रेल्वे स्थानकावर नुकताच असाच एक अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. एका महिलेने धावत्या ट्रेनमध्ये चढताना दोनदा आपला तोल गमावला, ती प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली, पण केवळ नशिबाने तिचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या लहान मुलासोबत प्रवास करत होती. गाडी स्थानकावर थांबलेली असताना ती पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरली. मात्र, अचानक गाडी सुरू झाली. आपले बाळ डब्यात एकटेच राहिल्याने महिला प्रचंड घाबरली आणि तिने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यासमोर फक्त आपले बाळ होते, त्यामुळे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता ती डब्याच्या हँडलला लटकली.

दोन वेळा कोसळली आणि फरफटत गेली

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, पहिल्या प्रयत्नात पाय घसरल्याने ती प्लॅटफॉर्मवर जोरात आदळली. इतका मोठा अपघात होऊनही माऊलीची ओढ तिला शांत बसू देत नव्हती. ती उठली आणि तिने पुन्हा दुसऱ्यांदा हँडल पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या भागात जाण्यापासून थोडक्यात वाचली आणि दूरवर फरफटत गेली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती कसाबसा तोल सांभाळत डब्यात चढण्यात यशस्वी झाली.

या घटनेचा सर्वात क्लेशदायक भाग म्हणजे, जेव्हा ही महिला मृत्यूशी झुंज देत होती, तेव्हा प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उपस्थित होते. मात्र, तिला वाचवण्यासाठी किंवा सावरण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अनेकजण केवळ उभे राहून हा थरार पाहत होते, तर काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात मग्न होते. संकटात सापडलेल्या महिलेला मदत करण्याऐवजी तमाशबीन बनून राहण्याच्या या प्रवृत्तीवर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com