कानपुरमध्ये एक दुख:द घटना घडली आहे. आई आणि बहीण डोळ्यासमोर जळून मरण पावले, पण असहाय्य भाउ शिवम त्यांना वाचवू शकला नाही. लोकांना मदत करण्याची विनंती करत होता. तरीही काही उपयोग झाला नाही. पत्नी आणि मुलीला वाचवताना शिवमचे वडील कृष्ण गोपाळ गंभीररित्या भाजले गेले आहे. शिवमसुध्दा थोड्या प्रमाणात जळाला आहे. मात्र दोन्ही महिलांचा जळून मृत्यू झाला.
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो उत्तर प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये घरातील अनेक वस्तू जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत. आगीच्या ज्वाला समोर दिसत आहेत. दोन लोकांच्या रडण्याचा आवाज येतो. हे दोघे कृष्ण गोपाळ आणि त्याचा मुलगा शिवम असल्याचा अंदाज आहे. व्हिडिओमध्ये 'शिवम' म्हणत आहे की बघा... माझी आई जळत आहे. हे सर्वजण गाडी सोडून निघून गेले आहेत.
उत्तर प्रदेशामधील कानपूर येथील ही घटना आहे. येथे रुरा पोलीस स्टेशन हद्दीतील मडौली गावात राहणारे कृष्ण गोपाल दीक्षित यांच्यावर गावातील सोसायटीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. जानेवारी महिन्यात महसूल विभागाच्या पथकाने कृष्ण गोपाळ यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात एसडीएम मठ ज्ञानेश्वर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, पोलीस आणि प्रशासनाचे पथक अतिक्रमण हटविण्यासाठी तेथे पोहोचले.
टिम तेथे पोहोचली आणि कृष्ण गोपाळ यांच्या झोपडीवर बुलडोझर चालवला. झोपडीवर बुलडोझरच्या कारवाईदरम्यान कुटुंबीयांचा अधिकाऱ्यासह वाद झाला. यादरम्यान झोपडीला आग लागली आणि कृष्ण गोपाळ यांची पत्नी प्रमिला दीक्षित आणि 23 वर्षांची मुलगी नेहा जिवंत जळाल्या.
या घटनेनंतर गावातील नागरिक प्रचंड संतप्त झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या टिमचा जमावाने पाठलाग केला. लेखपाल यांची गाडीवर हल्ला केला. वाढता तणाव पाहून घटनास्थळी पोलीस बंदोबस्तासह पीएसीची तुकडीही तैनात करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभिर्य पाहून कानपूरचे आयुक्त,एडीजी आणि आयजीही घटनास्थळी पोहोचले. कडक कारवाईचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले
जेव्हा बुलडोझर चालवला गेला तेव्हा कृष्ण गोपाळ यांची पत्नी आणि मुलगी झोपडीत होत्या, असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. झोपडीत बुलडोझर घुसताच त्याला आग लागली आणि दोन्ही महिला जिवंत जळाल्या. पण, याप्रकरणी पोलीस-प्रशासनानेही स्पष्टीकरण दिले आहे.
समाजवादी पक्षाने या प्रकरणी ट्विट केले आहे की, मुलगा त्याचे नाव घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करत आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर खून, हत्येचा कट रचणे, खंडणी वसूल करणे, धमकावणे अशा गंभीर कलमांत दोषी असलेल्या या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात कधी पाठवणार, असा प्रश्न समाजवादी पक्षाने विचारला आहे. नवे आयुक्त आल्यापासून ते नोएडाप्रमाणे वसुली आणि जमीन व्यवसायात गुंतले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट शेअर केले आहे.
या घटनेवर पोलिसांचे स्पष्टीकरण
या घटनेबाबत कानपूर देहातच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अतिक्रमण काढण्यासाठी एक टिम पोहोचली होती. त्या टिमची कारवाई सुरू झाल्यानंतर महिला आणि तिच्या मुलीने झोपडीत स्वत:ला कोंडून पेटवून घेतल्याने दोघाींचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई
या घटनेनंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे त्यात एसडीएम मठ ज्ञानेश्वर प्रसाद, रुरा एसएचओ दिनेश कुमार गौतम, लेखपाल अशोक सिंग, जेसीबी ड्रायव्हर दीपक, मदौली गावचे रहिवासी अशोक, अनिल, निर्मल आणि विशाल यांचा समावेश आहे. याशिवाय 10 ते 12 अनोळखी साथीदार, 3 लेखापाल आणि 12 ते 15 महिला व पुरुष पोलिस कर्मचार्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांवर (302) आणि (307) अशा एकूण 6 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी कृष्ण गोपाळ दीक्षित यांच्या झोपडीवर बुलडोझरची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री कुटुंबीयांनी जिल्हा दंडाधिकारी नेहा जैन यांचे कार्यालय गाठले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.