पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात एकूण 13 देशांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या मागे आहेत. पीएम मोदींच्या अप्रूव्हल रेटिंगबद्दल बोलायचे तर ते 70 टक्क्यांच्या जवळपास आहे.
5 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींनी मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी, जर्मन चांसलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक नेत्यांना मागे टाकले आहे. सर्वेक्षणात म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधानांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला आणि रेटिंग कमी झाले. हा तो काळ होता जेव्हा देश ऑक्सिजनच्या भिषण समस्येला तोंड देत होता. मात्र भारताने लवकरच या अडचणीवर मात केली.
या नेत्यांचाही सर्वेक्षणात समावेश
या सर्वेक्षणात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरले आहेत. त्याच वेळी, ब्रिटनचे पंतप्रधान गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी 8 व्या ऐवजी 10 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
पीएम मोदींचे रेटिंग सुधारले
या सर्वेक्षणात मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग सर्वाधिक 84 टक्के नोंदवले गेले. हा तो काळ होता जेव्हा भारत कोरोना महामारीतून बाहेर पडत होता. यापूर्वी जूनमध्ये मंजुरीचे रेटिंग जारी करण्यात आले होते, त्या तुलनेत आता त्यात सुधारणा झाली असून पंतप्रधानांचे हे रेटिंग जूनमध्ये 66 टक्के असताना आता ते 70 टक्के झाले आहे. पीएम मोदींच्या नापसंत रेटिंगमध्येही मोठी घसरण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.