देश झाला भावुक, 38 वर्षांपासून गायब असलेलं शहीदाचं पार्थिव मुळगावी पोहचणार

1984 मध्ये सियाचीनच्या माथ्यावर गेलेल्या युनिटमधील अनेक जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले आहे.
Mortal Remains of LNk Chander Shekhar who lost his life during deployment in Operation Meghdoot in 1984 arrived in Leh
Mortal Remains of LNk Chander Shekhar who lost his life during deployment in Operation Meghdoot in 1984 arrived in LehANI
Published on
Updated on

1984 मध्ये सियाचीनच्या माथ्यावर गेलेल्या युनिटमधील अनेक जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले आहे. आताही अशी दोन कुटुंबे आहेत जी आपल्या प्रियजनांची आशेने वाट पाहत आहेत. शहीद लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला (Mortal Remains of LNk Chander Shekhar) यांच्यासह नाईक दया किशन जोशी आणि शिपाई हयात सिंग हे देखील शहीद झाले होते.

सियाचीन ग्लेशियरमध्ये 38 वर्षांपूर्वी बर्फाच्या वादळामुळे बेपत्ता झालेले लष्कराचे जवान लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. अमर बलिदान देणाऱ्या लान्स नाईक चंद्रशेखर यांच्या ड्रेसवर सापडलेल्या धातूच्या दोन्ही बॅचमधून मृतदेहाची ओळख पटवण्यात भारतीय लष्कराच्या गस्ती पथकाला मदत झाली आहे. 29 मे 1984 रोजी चंद्रशेखर बर्फाळ वादळात अडकले होते. त्यानंतर त्याचा शोध लागला नाही. आता तब्बल 38 वर्षांनंतर त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. उत्तराखंडमधील हल्दवानी येथे त्यांचे कुटुंबीय 38 वर्षांपासून याची वाट पाहत आहेत.

Mortal Remains of LNk Chander Shekhar who lost his life during deployment in Operation Meghdoot in 1984 arrived in Leh
ITBP Bus Accident: ITBP जवानांच्या बसला अपघात, 6 जवान शहीद, 32 जखमी

दरम्यान, 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूतमध्ये (Operation Meghdoot) तैनात असताना प्राण गमावलेल्या एलएनके चंद्रशेखर यांचे पार्थिव अवशेष लेहमध्ये आले. यावेळी पूर्ण लष्करी सन्मानासह त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि काही वेळातच पार्थिव कुटुंबीयांना सुपूर्द केले जाईल:

चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पत्नी शांती देवी यांनी या 38 वर्षांत पतीचा मृतदेह मिळण्याची आशा क्षणभरही सोडली नाही. त्या म्हणतात की, तुमचा विश्वास दृढ असेल तर संपूर्ण निसर्ग तुमच्यापुढे नतमस्तक होतो. शांतीदेवींचा हा विश्वास खरा ठरला. या 13 वर्षात त्यांनी संपुर्ण कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. एवढेच नाही तर त्यावेळी त्यांनी चार वर्ष आणि दीड वर्षाच्या दोन्ही मुलींचे संगोपन केले. यादरम्यान लष्कराकडून मोठी मदत झाली. 38 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या पतीचे अवशेष सापडल्याचे लष्कराने त्यांना सांगितले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी शांती देवी यांची खात्री पटली.

Mortal Remains of LNk Chander Shekhar who lost his life during deployment in Operation Meghdoot in 1984 arrived in Leh
Jammu Kashmir: शोपियानमध्ये पुन्हा काश्मिरी पंडिताची हत्या, सुरक्षा दलाचा परिसराला वेढा

चंद्रशेखर हरबोला हे 19 कुमाऊँ रेजिमेंटचे सैनिक होते. 1975 मध्ये ते सैन्यात दाखल झाले. 1984 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचीनचे युद्ध झाले. त्यानंतर पाकिस्तानचे दात खच्ची करण्यासाठी भारताने ऑपरेशन मेघदूत सुरू केले. याच ऑपरेशन अंतर्गत मे 1984 मध्ये सियाचीनच्या उंच टेकड्यांवर 20 सैनिकांची तुकडी गस्त घालण्यासाठी पाठवण्यात आली होती. चंद्रशेखरही त्याच गस्ती पथकाचा भाग होते. ग्लेशियर तुटल्याने चंद्रशेखर यांना 29 मे रोजी वादळाचा तडाखा बसला होता. आणि त्यातच ते बेपत्ता झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com