Chickenpox Outbreak: केरळमध्ये वेगाने पसरतोय चिकनपॉक्स; 6 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Kerala Chickenpox Outbreak: केरळमध्ये चिकनपॉक्सची प्रकरणे वेगाने समोर येत आहेत. आतापर्यंत 6 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
Chickenpox Outbreak
Chickenpox OutbreakDainik Gomantak

Chickenpox Outbreak:

केरळमध्ये चिकनपॉक्सची प्रकरणे वेगाने समोर येत आहेत. आतापर्यंत 6 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय, चिकनपॉक्समुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. वाढती प्रकरणे पाहून प्रशासनही चिंतेत आहे. वाढत्या प्रकरणांना ब्रेक लावण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात अलर्ट जाहीर केला असून रुग्णांना शक्य ते सर्व उपचार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्याचा प्रसार रोखता यावा यासाठी रुग्णालयात जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

चिकनपॉक्स कसा पसरतो?

चिकनपॉक्स हा व्हेरिसेला झोस्टर व्हायरसने पसरतो. त्यामुळे सुरुवातीला त्वचेवर पुरळ आणि ताप येतो आणि ही लक्षणे 10 दिवस टिकतात. चिकनपॉक्सची बहुतेक प्रकरणे प्रौढांपेक्षा मुलांमध्ये जास्त दिसतात. याला आळा घालण्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे, जी लहान वयातच बालकाला दिली जाते जेणेकरुन बालकाचा या गंभीर आजारापासून बचाव करता येईल.

चिकनपॉक्सची लक्षणे

- ताप

- भूक न लागणे

- डोकेदुखी

- थकवा

- अशक्तपणा

- शरीरावर लहान पुरळ उठणे

Chickenpox Outbreak
Kerala Court: अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करणाऱ्या बापाला 123 वर्षांची शिक्षा, दोन वर्षांत 'न्याय'

चिकनपॉक्सपासून बचावासाठी

- सध्या, चिकनपॉक्सला प्रतिबंध करण्यासाठी एक लस उपलब्ध आहे, ती सहसा 12 ते 15 महिने आणि 4 ते 6 वर्षांच्या वयात दिली जाते. तसेच, ज्या प्रौढांना अद्याप चिकनपॉक्सची लस मिळालेली नाही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस घेऊ शकतात.

- चिकनपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही हा संसर्ग पसरतो, त्यामुळे चिकनपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीचा संपर्क टाळा.

- स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. खोकला, शिंकताना आणि शौच झाल्यावर हात स्वच्छ धुवा. साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास सॅनिटायझर वापरा.

- खोकताना आणि शिंकताना, शिंकताना हाताच्या कोपराने तोंड दाबून घ्या जेणेकरुन हा रोग पसरण्यापासून रोखता येईल.

- या आजारापासून आजारी व्यक्ती, विशेषत: गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध लोकांपासून अंतर ठेवा.

-शक्य तितके, बाहेर पडू नका आणि घरीच राहा, जर बाहेर जायचे असेल तर मास्क घालूनच बाहेर जा.

- प्रतिकारशक्ती वाढवा, यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com