
Mohammed Siraj Harry Brook: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्यात (Oval Test Match) भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना भारताला एक महत्त्वाची विकेट मिळण्याची संधी होती, पण मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) एका चुकीमुळे इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला (Harry Brook) जीवदान मिळाले. यामुळे विजयाचा जल्लोष करत असलेले भारतीय खेळाडू काही क्षणातच निराश झाले.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 35व्या षटकात प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकने शॉट मारला आणि चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत उडाला.
बाउंड्रीजवळ (Boundary) उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजने चेंडूचा वेध घेऊन तो पकडला. विकेट मिळाल्याचा आनंदात प्रसिद्ध कृष्णा आणि इतर खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
पण त्याचवेळी, चेंडू पकडताना सिराजचा तोल गेला आणि त्याचा पाय बाउंड्री लाईनला (Boundary Line) लागला. त्यामुळे, अम्पायरने ब्रूकला 'सिक्सर' (Six) दिला आणि तो आऊट झाला नाही.
या घटनेमुळे सिराजही खूप निराश झाला. एकाच क्षणात विजयाचा आनंद दुःखात बदलला आणि प्रसिद्ध कृष्णाच्या चेहऱ्यावरील हास्यही गायब झाले.
दरम्यान, या जीवनादानानंतर हॅरी ब्रूकने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. त्याने 54 चेंडूत 62 धावा केल्या, दुसऱ्या बाजूला अनुभवी फलंदाज जो रुट (Joe Root) 40 धावांवर खेळत आहे. याआधी, सलामीवीर बेन डकेटने (Ben Duckett) 54 आणि कर्णधार ओली पोप (Ollie Pope) याने 27 धावा करुन इंग्लंडला चांगली सुरुवात दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.