कर्मचाऱ्यांनो ऑफिसच्या कँटीनमध्येच जेवा स्वस्तात मस्त

सरकारच्या एका निर्णयामुळे करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
AUTHORITY FOR ADVANCE RULINGS
AUTHORITY FOR ADVANCE RULINGSDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारच्या एका निर्णयामुळे करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ऑफिसच्या कँटीनमध्ये जेवणासाठी तुम्ही जे काही बिल द्याल ते जीएसटी फ्री असणार आहे. म्हणजेच तुमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधील जेवणाच्या बिलावर जीएसटी लागणार नाही. अॅथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंग (AUTHORITY FOR ADVANCE RULINGS) च्या बंगळुरू खंडपीठाने कॅडिला कंपनीच्या प्रकरणात आपला निर्णय सुनावताना म्हटले की, कँटीनमध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या जेवणाच्या बिलावर जीएसटी लागू होऊ शकत नाही. कंपनी कॅन्टीनच्या कंत्राटदाराला जी सबसिडी देईल त्यावरच GST लागू होणार आहे. या निर्णयानुसार ऑफिस कँटीनचे जेवण आता स्वस्तात मस्त होणार आहे. (Millions of workers have been relieved by a government decision)

AUTHORITY FOR ADVANCE RULINGS
केरळमध्ये 'शिगेला'चा कहर, काहीही खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बेंगळुरू अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगचे असे म्हणणे आहे की, जर एखाद्या कर्मचाऱ्याकडून कॅन्टीन शुल्क म्हणून कोणतीही रक्कम वसूल केली असेल तर GST लागू होणार नाहीये. अनेक कंपन्या कँटीन सेवेसाठी त्यांच्या कर्मचार्‍यांवर शुल्क आकारतात आणि ते त्यांच्या कॅन्टीन ऑपरेटरला देत असतात. सरकारच्या या निर्णयानंतर जे कर्मचारी खाण्यापिण्यासाठी ऑफिसच्या कॅन्टीनवर अवलंबून आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कॅन्टीनच्या कंत्राटदाराच्या देयकावर जीएसटी आकारला जाणार आहे,

आतापर्यंत जीएसटी विभाग कॅन्टीनच्या कंत्राटदाराला कंपनीने दिलेल्या संपूर्ण रकमेवर 5% जीएसटी आकारत होता, परंतु जेव्हा हे प्रकरण जीएसटी न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केले की, कंपनी सेवा प्रदात्याला सबसिडी म्हणून देणाऱ्या रकमेवरच जीएसटी आकारू शकतो. तर कर्मचारी कॅन्टीनमध्ये जी रक्कम भरतो, त्या रकमेवर जीएसटी आकारला जाऊ शकत नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com