भारत आणि चीन मध्ये लष्करी पातळीवर चर्चा

पूर्व लद्दाख येथील गलवानमध्ये खोर्यामधील सुरू असलेला लष्करी वाद संपवण्यासाठी पुन्हा एकदा भारत आणि चीन या देशादरम्यान बैठक होत आहे.
India China Border
India China BorderDainik Gomantak
Published on
Updated on

पूर्व लद्दाख येथील गलवानमध्ये खोर्यामधील सुरू असलेला लष्करी वाद संपवण्यासाठी पुन्हा एकदा भारत आणि चीन या देशादरम्यान बैठक होत आहे. बुधवारपासून दोन्ही देशांमधील लष्करी पातळीवरील या चर्चेची 14वी फेरी सुरू करण्यात आली आहे. पूर्वी 10 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही देशांचे कमांडर मध्ये चर्चेची 13वी फेरी झाली होती. त्यानंतर भारत (India) आणि चीन (China) देशांच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील थांबलेला हा संवाद तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा सुरू झाला. सुरक्षा आस्थापनांशी संबंधित सूत्रांनी लष्करी (military)स्तरावरील चर्चेच्या 14व्या फेरीच्या सुरुवातीची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवानमधील नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूने चुशुल-मोल्डो येथे कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 14वी फेरी होत आहे.(India China Border News)

20 महिन्यांपासून संघर्ष सुरू

पूर्व लडाखच्या सीमेवर 5 मे 2020 रोजी पॅंगॉन्ग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव निर्माण झाला होता. म्हणजे 20 महिन्यांपासून गलवानमध्ये (galwan-valley)भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू आहे. तेव्हापासून या भागात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैनिक आणि शस्त्रे तैनात करण्यात आली होती. लष्करी आणि राजनैतिक(political) पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर, दोन्ही बाजूंनी गेल्या वर्षी पॅंगॉन्ग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील किनारी भागातील आणि गोगरा परिसरातून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

India China Border
Assembly elections 2022: यूपीपासून ते गोव्यापर्यंत भाजपला झटका

'हॉट स्प्रिंग्स' भागातील सैन्य मागे घेण्यावर लक्ष केंद्रित

त्याचवेळी, लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सुरू झालेल्या या चर्चेत प्रामुख्याने 'हॉट स्प्रिंग्स' भागातील सैन्य मागे घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह स्थित 14 व्या कॉर्प्सचे नवीन कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल (Lieutenant General) अनिंद्य सेनगुप्ता तर चीनच्या बाजूचे नेतृत्व दक्षिण जियांगयांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचे प्रमुख मेजर जनरल यांग लिन करणार. या चर्चेत डेपसांग बुलगे आणि डेमचोकमधील मुद्द्यांवर तोडगा काढण्यासह सर्व संघर्षाच्या ठिकाणांहून लवकरात लवकर लष्कर मागे घेण्यावर भारतीय पक्ष आग्रह धरेल अशी अपेक्षा आहे.

पॅंगॉन्ग तलावाजवळ चीनच्या बांधकामादरम्यान चर्चा

पूर्व लडाखमधील (Ladakh)पॅंगॉन्ग तलाव भागात चीनकडून पूल बांधला जात आहे. अश्या वेळी दोन्ही देशांमध्ये ही चर्चा होत आहे. त्यामुळे तिथे भारताने त्यावर देखरेख ठेवण्या संदर्भात चर्चा केली. हा भाग गेल्या 60 वर्षांपासून चीनच्या अवैध कब्जात असल्याचे भारताचे म्हणने आहे. तसेच गेल्या आठवड्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील काही भागांना नावे दिली होती, परंतु भारताने हे सर्व दावे साफ फेटाळून लावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com