Meghalaya Violence: गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा, शिलाँगमध्ये संचारबंदी लागू

शिलाँगचे जिल्हा दंडाधिकारी ईशवंदा लालू (Ishwanda Lalu) यांनी रविवारी रात्री 8 वाजेपासून शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी जाहीर केली.
Meghalaya Violence
Meghalaya ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

मेघालयचे गृहमंत्री लहकमान रिंबुई (Lahkaman Rimbui) यांनी शिलाँगमध्ये पोलीस चकमकीत दहशतवाद्याच्या हत्येवरुन झालेल्या हिंसाचारादरम्यान राजीनामा दिला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. त्याचवेळी, शिलाँगचे जिल्हा दंडाधिकारी ईशवंदा लालू (Ishwanda Lalu) यांनी रविवारी रात्री 8 वाजेपासून शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी जाहीर केली. शहरातील परिस्थिती तणावपूर्ण राहिल्याने काही भागात तुरळक हिंसक घटना घडल्या. आदेशात जिल्हा दंडाधिकारी म्हणाले, " या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा आदेश पूर्व-पक्षीयरित्या काढण्यात आला असून 17 ऑगस्टच्या सकाळी 5 वाजेपर्यंत आदेश लागू राहणार आहे."

Meghalaya Violence
शेतकऱ्यांनी सिंघु बॉर्डरवर फडकवला तिरंगा; माजी सैनिकांनी दिली सलामी

प्राप्त माहितीच्या आधारे प्रशासनाने सांगितले की, दगडफेक, जाळपोळ आणि चोरीच्या घटना घडल्या आहेत. शिलाँग शहरातील काही भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. "शांतता भंग करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीच्या घटना घडू शकतात, अशा परिस्थितीत शहर आणि जिल्ह्याच्या इतर भागात हिंसा पसरण्याची शक्यताही या आदेशातून वर्तविण्यात आली आहे.

Meghalaya Violence
पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली, स्वातंत्रदिनी रचलेला हल्ल्याचा कट उधळला

संपूर्ण महापालिका क्षेत्र, संपूर्ण कॅन्टोन्मेंट क्षेत्र, मावपत ब्लॉकचे सर्व क्षेत्र, माईलीम ब्लॉक अंतर्गत उमशीर्पी पुलापासून 7 व्या मैलापर्यंत अप्पर शिलाँगचे क्षेत्रामध्ये संचारबंदी लागू असणार आहे. मदरिंग, लैटकोर, नोंगकेश, उमलिंग्का, लोसोहटुन, मावडियांगडियांग, डिएन्गयॉन्ग, सिजेओंग.

Meghalaya Violence
पुलवामा हल्ल्याची पाकची कबुली

दरम्यान, मेघालय सरकारने मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा शिलाँगच्या काही भागात 48 तासांसाठी बंद केल्या आहेत. ज्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते तसेच सार्वत्रिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com