Meghalaya: 'वेश्यालय' चालवणाऱ्या भाजप नेत्याला उत्तर प्रदेशात अटक

Meghalaya News: मेघालयातील भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन माराक यांना उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली आहे.
BJP Leader
BJP LeaderDainik Gomantak
Published on
Updated on

Meghalaya News: मेघालयातील भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन माराक यांना उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर फार्महाऊसमध्ये 'वेश्यालय' चालवल्याचा आरोप आहे. शनिवारपासून ते फरार होते. मेघालयचे डीजीपी एलआर बिश्नोई यांनी सांगितले की, 'माराकला हापूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी मेघालय पोलिसांनी अलर्ट जारी केला होता. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करताना माराक याला अटक करण्यात आली.'

दरम्यान, एक दिवस आधी तुरा कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. शनिवारी, वेस्ट गारो हिल्स जिल्हा पोलिसांनी दावा केला की, आम्ही बर्नार्ड यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी एका अल्पवयीन मुलीसह पाच मुलांची सुटका करण्यात आली. याशिवाय 75 जणांना अटक करण्यात आली आहे.

BJP Leader
Meghalaya: प्रवेश बंदीचं नियमन करणाऱ्या विधेयकाला राज्यपालांनी लावला ब्रेक

दुसरीकडे, बर्नार्ड हे बंडखोर गट अचिक नॅशनल व्हॉलंटियर कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत. भाजपच्या (BJP) आरोपांवर मेघालयचे (Meghalaya) मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा म्हणाले, 'हा पोलिसांचा (Police) मामला आहे, मला त्यात काहीही बोलायचे नाही. पुराव्यांच्या आधारे पोलीस कारवाई करत आहेत. कायदेशीर प्रक्रियेतून पोलिस कार्यवाही करत आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, जी काही कारवाई केली जाईल ती कायद्यानुसारच होईल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com