दैनिक भास्करला मोठा झटका, देशभरातील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

आयकर विभागाच्या या कारवाईला भास्कर (Dainik Bhaskars) समूहाच्या निर्भीड पत्रकारितेच्या कारणांची जोड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी या समूहास पाठींबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
Media Group Dainik Bhaskars offices raids by Income Tax Department
Media Group Dainik Bhaskars offices raids by Income Tax Department Twitter @ANI
Published on
Updated on

गुरुवारी सकाळी मीडिया ग्रुप दैनिक भास्करच्या (Dainik Bhaskars) देशभरातील अनेक कार्यालयांमध्ये आयकर विभागाने(Income Tax) छापे टाकले आहेत. सूत्रांनी सांगितले की भास्कर समूहावर कर चोरीचा(Tax Evasion) आरोप आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिका्यांनी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात दैनिक भास्करच्या कार्यालयावर छापे टाकत कारवाई केली आहे. तसेच भास्कर ग्रुपच्या जयपूर, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदूर कार्यालयांवरही छापेमारी सुरू आहे.(Media Group Dainik Bhaskars offices raids by Income Tax Department)

आयकर विभागाच्या या कारवाईला भास्कर समूहाच्या निर्भीड पत्रकारितेच्या कारणांची जोड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी या समूहास पाठींबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. देशातील सर्वात मोठे वृत्तपत्र गट असलेल्या दैनिक भास्करने कोविडच्या दुसर्‍या लाटेच्या विध्वंसविषयी बातमी देण्यामध्ये मोठी आघाडी आघाडी घेतली होती.

Media Group Dainik Bhaskars offices raids by Income Tax Department
भारताला पाकिस्तान बनवण्याचा काही लोकांचा डाव- मोहन भागवत

आयकर अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, भोपाळ, जयपूर आणि इतर ठिकाणी असलेल्या दैनिक भास्करच्या मीडिया ग्रुपच्या अनेक जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळसह इंदूरमधील वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर छापे टाकले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आयकर विभागाचे अधिकारी वृत्तपत्र समूहाच्या प्रवर्तकांच्या निवासस्थानाचीही झडती घेत आहेत. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, या समूहाने कर चुकल्याची नोंद झाल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.

दैनिक भास्कर समूह हा देशातील सर्वात मोठा मीडिया समूह आहे, ज्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये डझनभराहूनही अधिक राज्यांमध्ये 60 हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याचे मुख्यालय मध्य प्रदेशात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com