यूपीची CM किंवा भारताची PM बनू शकते, 'पण...': मायावती

बहुजन समाज पक्षाचे (BSP) सरचिटणीस सतीश मिश्रा आणि बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
Mayawati
MayawatiDainik Gomantak
Published on
Updated on

बहुजन समाज पक्षाचे (BSP) सरचिटणीस सतीश मिश्रा आणि बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या बैठकीनंतर बसपा सुप्रीमो मायावती यांनी पत्रकार परिषद घेतली . त्यांनी यामध्ये समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) अनेक गंभीर आरोप केले. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत मायावती म्हणाल्या की, यूपी निवडणुकीला हिंदू-मुस्लिम रंग देण्यासाठी भाजप-सपा यांची मिलीभगत होती. भाजपच्या (BJP) सत्तेत पुनरागमनाची जबाबदारी समाजवादी पक्ष आणि त्यांच्या प्रमुखांवर आहे. (Mayawati said I Can become CM of UP but PM of India not at all)

Mayawati
"पंतप्रधान मोदी जबाबदारी झटकतात"; राहुल गांधींसह ममतांचा सरकारवर हल्लाबोल

पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या की, ''समाजवादी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी यूपीची मुख्यमंत्री किंवा देशाची पंतप्रधान होऊनच देशाची सेवा करु शकते. परंतु राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुस्लिमांनी बसपाला मतदान केले तर मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते. बसपा सरकारच्या काळात बांधलेल्या स्मारकांची सपा सरकार आणि भाजप सरकारकडून देखभाल केली जात नाही. बसपाचे शिष्टमंडळ सतीश मिश्रा आणि उमाशंकर सिंह यांनी यासंदर्भात माझे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. एसपीकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हेतू केवळ स्मारकांबाबत होता.''

मायावती पुढे म्हणाल्या की, ''रमजानच्या महिन्यात वीज तोडणे योग्य नाही. सरकारने याबाबत काहीतरी केले पाहिजे. मुस्लिम (Muslim) आणि इतरांवरील सर्व अत्याचारांना सपा पक्ष जबाबदार आहे.''

Mayawati
लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर; जमा केला 10 लाखांचा दंड

मायावतींच्या म्हणण्यानुसार, सत्ता सोडल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत उभारलेल्या उद्यानांची आणि स्मारकांची काळजी घेतली जात नाही. अशा स्थितीत राज्याच्या विद्यमान सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com