

दुसऱ्या धर्मामधील पुरुषाशी मुलाशी लग्न केल्यामुळे तब्बल आठ वर्षाने बापानेच मुलीची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील सिध्दार्थनगर (Siddharthnagar)जिल्ह्यातील परिसरात रविवारी सायंकाळी घडला आहे. या प्रकरणात 55 वर्षीय बापाला अटक केली आहे. 28 वर्षीय सुनिता तिच्या सासरच्या घरासमोर उभी असताना ही घटना घडली आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांच्या (Uttar Pradesh Police) मते, 2013 मध्ये सुनिता (Sunita) तिचा शेजारी राहणारा अब्दुल मोतीन (Abdul Motin) सोबत मुंबईला (Mumbai) पळून गेली होती. मात्र सुनिताचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. तर दुसरीकडे तिच्या कुटुंबीयांनी अब्दुलच्या विरोधात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र अब्दुल आणि सुनिता सज्ञान असल्यामुळे ही केस बंद करण्यात आली होती. (Married to a Muslim youth after eight years the father killed his daughter)
दरम्यान, सुनिता आणि तिचा पती तीन आठवड्यापूर्वीच दोन मुलांसह परत आपल्या गावात राहण्यासाठी आली होती. ती तिच्या सासरी राहत होती. अब्दुलचे सलूनचे दुकान असल्याने तीन तो दिवसानंतर मुबंईला परत गेला. मात्र सुनिता गावामध्ये राहत असल्यामुळे तिचे वडिल विश्वनाथ शर्मा वारंवार तिला मुंबईला जाण्यासाठी दबाव टाकत होते. सुनिता रविवारी सायंकाळी तिच्या घराबाहेर असल्याचे वडिलांनी पाहिले. तेव्हा तिला पुन्हा एकदा मुंबईला जाण्यास सांगितले. सुनिता आणि वडिलांचे खूप कडाक्याचे भांडण झाले.
दरम्यान, सुनिताला तिच्या वडिलांनी दगडाने डोक्यात मारले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. चिल्हिया पोलिस ठाण्याचे (Chilhia Police Station) पोलिस अधिकारी यशवंत सिंग (Yashwant Singh) यांनी सांगितले. सुनिताच्या नवऱ्याचा मुंबईवरुन फोन आल्यानंतर या घटनेबाबत समजले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर तिच्या पोलिसांनी सुनिताच्या वडिलांना अटक केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.