नवी दिल्ली: Weather Update उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा जबर तडाखा बसला असताना दिल्लीमध्ये शुक्रवारी थंड वारे वाहू लागल्याने स्थानिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Many states in northern India have been hit hard by the heat wave)
दुसरीकडे त्रिपुरामध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने दोन हजार लोकांना शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. मागील 48 तासांमध्ये ईशान्येकडील राज्यांना अतिवृष्टीने अक्षरश ः झोडपून काढले असून रस्ते आणि ऊर्जा पुरवठा करणारी यंत्रणा आणि पिकांचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंजाब आणि हरियानामध्ये 40 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील चुरू येथील पारा 43.7 अंशांवर गेला होता, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हरियानातील गुडगाव येथे 43.5 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. हा भाग दिल्ली परिसरामध्ये येतो. आज दिल्लीवर काळे ढग दाटल्याने थंड वारे वाहू लागले होते, यामुळे उष्णतेमध्ये होरपळणाऱ्या राजधानीवासीयांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान हा दिलासाही फार काळ टिकण्याची शक्यता नाही. (Many states in northern India have been hit hard by the heat wave)
भातपिकाचे नुकसान
पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.