Manipur Voilence: मणिपूरमध्ये लष्करावर गोळीबार; दोन जवान जखमी

Manipur Voilence: मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातून दररोज हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत.
Manipur Violence
Manipur ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Voilence: मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातून दररोज हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने सांगितले की, हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोन सैनिक जखमी झाले आहेत.

स्पीयर कॉर्प्सने सांगितले की, गुरुवारी सकाळी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील एन बोलझांग येथे लष्करावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान किरकोळ जखमी झाले. दोन्ही जवानांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरक्षा दलाच्या झडतीदरम्यान एक इंसास लाइट मशीन गन जप्त करण्यात आली.

यापूर्वी, 18-19 जूनच्या मध्यरात्री कांटो सबल येथून चिंगमांग गावाकडे सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे.

जवानला बंदुकीची गोळी लागली आणि त्याला लेमाखॉन्गच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

अनुसूचित जमाती (एसटी) यादीत मेईटीचा समावेश करण्याच्या मागणीचा निषेध करण्यासाठी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन (एटीएसयू) ने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान 3 मे रोजी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाला.

Manipur Violence
Karnataka High Court: विवाहित स्री, विवाहबाह्य संबंध अन् 'तो' आरोप...! तक्रारदार महिलेला कोर्टाची सणसणीत चपराक

मणिपूरमध्ये महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मणिपूरमध्ये अजूनही जाळपोळ सारख्या घटना घडत असल्याने, राज्य सरकारने मंगळवारी इंटरनेटवरील बंदी आणखी पाच दिवसांनी 25 जूनपर्यंत वाढवली आणि शांततेला आणखी खीळ बसू नये यासाठी प्रयत्न केले.

Manipur Violence
PM Modi Special Gifts: 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा! PM मोदींनी बायडन, फर्स्ट लेडीला गिफ्ट केल्या 'या' वस्तू, पाहा व्हिडिओ

मणिपूरमध्ये हिंसाचार कसा सुरू झाला?

सुमारे दीड महिन्यापूर्वी मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात शंभरहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील मेईतेई समाज अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहे. मेतेई समाजाच्या या मागणीच्या निषेधार्थ 3 मे रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हाणामारी सुरू झाली. सध्या राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com