Manipur: मणिपूरसाठी आवाज उठवल्याबद्दल प्रसिद्ध गायक Akhu Chingangbam चे अपहरण!

Akhu Chingangbam Kidnapped: मणिपूर अनेक दिवसांपासून जळत आहे. कधी हिंसाचाराच्या तर कधी महिलांशी गैरवर्तन झाल्याच्या बातम्या येतात.
Akhu Chingangbam Kidnapped
Akhu Chingangbam KidnappedDainik Gomantak
Published on
Updated on

Akhu Chingangbam Kidnapped: मणिपूर अनेक दिवसांपासून जळत आहे. राज्यातून कधी हिंसाचाराच्या तर कधी महिलांशी गैरवर्तन झाल्याच्या बातम्या येतात. अलीकडेच महिलांसोबतचा सामाजिक मुद्दाही चर्चेत होता. पण आता मणिपूरच्या एका प्रसिद्ध गायकाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. अखू चिंगांगबम असे या गायकाचे नाव आहे. ही घटना काल घडली. असे वृत्त आहे की, काही सशस्त्र गुन्हेगार इंफाळमधील चिंगांगबमच्या घरात घुसले आणि त्यांनी त्याच्या आई आणि पत्नीला बंदुकीचा धाक दाखवला. यानंतर त्यांनी अखू चिंगांगबमला आपल्यासोबत नेले.

इंफाळ टॉकीजचे संस्थापक

दरम्यान, 29 डिसेंबरची ही घटना अशा वेळी घडली जेव्हा मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार उसळला आहे. आज तकच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, काही अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. तो इंफाळ टॉकीज नावाच्या स्थानिक ब्रँडचा संस्थापक देखील आहे. अखू चिंगांगबम हा गायक तसेच सामाजिक कार्यकर्ता आहे. अखू सोशल मीडिया इंस्टाग्रामवर देखील सक्रिय आहे.

Akhu Chingangbam Kidnapped
Manipur Violence: 7 महिन्यांनंतर इंटरनेट सुरु होताच मणिपूरमधील परिस्थिती चिघळली, पुन्हा दंगलीत 13 जणांचा मृत्यू!

अपहरणाच्या घटना घडल्या

चिंगांगबमचे अपहरण होण्यामागचे कारणही समोर आले आहे. असे वृत्त आहे की, तो त्याच्या सोशल मीडियावर हिंसाचाराच्या विरोधात सातत्याने लिहायचा आणि मणिपूरच्या शांततेसाठी आवाज उठवत असे. मणिपूरमध्ये त्याच्या गायिकेला पसंत केले जाते. अखूचे खरे नाव रोनिद चिंगांगबम आहे. 2016 मध्ये वर्ल्ड म्यूजिक डे ला त्याचा अपघात झाला होता, त्यानंतर अखूची श्रवणशक्ती गेली होती. अखू चिंगांगबम एमटीव्ही म्युझिक इंडियाच्या टीव्ही शो द देवरिस्टमध्ये देखील दिसला आहे.

Akhu Chingangbam Kidnapped
Manipur Violence: ''हिंसाचाराची चौकशी करा, अन्यथा…'', कुकी ग्रुपने दिला मोदी सरकारला 14 दिवसांचा अल्टिमेटम

आतापर्यंत हिंसाचारामुळे अनेक मृत्यू झाले आहेत

मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल बोलायचे झाल्यास, मैतेई आणि कुकी यांच्यात यावर्षी मे महिन्यात हिंसाचाराचा भडका उडाला. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com