Tripura New CM Oath: माणिक साहा यांनी त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

माणिक साहा यांनी त्रिपुराचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Manik Saha sworn in as Tripura new chief minister
Manik Saha sworn in as Tripura new chief ministerDainik Gomantak
Published on
Updated on

भाजप नेते बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा (Manik Saha) यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. देब यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांनी 69 वर्षीय डॉ. साहा यांना भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच साहा यांनी त्रिपुराचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. (Manik Saha sworn in as Tripura new chief minister)

साहा हे राज्यसभेचे खासदारही आहेत,

त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपने निवडलेले साहा हे राज्यसभेचे खासदार देखील आहेत. ईशान्येकडील राज्यात बहुकोणीय लढतीच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपल्या नवीन मुख्यमंत्र्यांकडून पक्षाला विजय मिळवून देण्याची भाजपची अपेक्षा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसही एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो. त्याचवेळी अचानक झालेल्या या राजकीय उलथापालथीमुळे राज्यातील जनतेला आश्चर्य वाटत आहे.

2016 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता,

माणिक साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना 2020 मध्ये पक्षप्रमुख बनवण्यात आले आणि याच वर्षीच्या मार्चमध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. बिप्लब कुमार देब, दुसरे आणि माजी मुख्यमंत्री, तसेच राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची राजवट संपवली आणि 2018 मध्ये त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

राजीनाम्यापूर्वी बिप्लब यांनी शाह आणि नड्डा यांची घेतली भेट

राजीनामा देण्यापूर्वी बिप्लब देब यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली होती. राजीनामा दिल्यानंतर बिप्लव म्हणाले की, पक्ष सर्वात वर आहे आणि मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पुढे ते म्हणाले की, मला आशा आहे की माझ्यावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी योग्यरित्या पार पाडेन. आता राज्यात पक्षाच्या बळावर काम करणार असल्याचे बिप्लव या वेळी सांगितले.

भाजपने एका वर्षात चार राज्यांचे बदलले मुख्यमंत्री

तर गेल्या वर्षभरात भाजपने चार राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये, पक्षाने तीरथ सिंह रावत यांची जागा घेत, पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवले. त्यामुळे त्याच महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा देऊन बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले. यानंतर सप्टेंबरमध्ये पक्षाने विजय रुपानी यांची जागा घेत भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. आणि आता हा बदल त्रिपुरामध्ये देखील पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com