Viral Video: अजब-गजब ड्रामा! होर्डिंगवर झोपलेल्या पठ्ठ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ; नेटकरी म्हणाले...

Shocking Video Viral: सोशल मीडियाच्या जगात दररोज काही ना काहीतरी धक्कादायक किंवा मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Shocking Video Viral
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Shocking Video Viral: सोशल मीडियाच्या जगात दररोज काही ना काहीतरी धक्कादायक किंवा मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ आपल्याला हसवतात, तर कधी लोकांचे अजब-गजब वर्तन पाहून आपण थक्क होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने केलेली कृती पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि त्याचबरोबर त्याच्या जीवाची काळजी वाटू लागेल. हा व्हिडिओ कुठला आहे आणि तो कधी रेकॉर्ड केला गेला, याची माहिती उपलब्ध नाही. पण व्हिडिओमध्ये दिसणारा प्रकार पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Shocking Video Viral
Viral Video: पाणीपुरीसाठी महिलेचा राडा! भररस्त्यात बसून अडवली वाहतूक, म्हणते, 'मला दोन पाणीपुरी खाऊ घाला, नाहीतर...'

व्हिडिओत नेमकं काय दिसलं?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची (Video) सुरुवात जूम इन केलेल्या शॉटने होते. यामध्ये एक व्यक्ती एका जागी आडवी पडलेली दिसते, पण ती कुठे आहे हे सुरुवातीला कळत नाही. काही सेकंदांनंतर जेव्हा कॅमेरा झूम आउट होतो, तेव्हा समोर आलेले दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. ती व्यक्ती जमिनीवर नसून एका मोठ्या जाहिरातीच्या होर्डिंगवर झोपलेली आहे, हे स्पष्ट होते. होर्डिंगची उंची इतकी जास्त आहे की, तो खाली पडला तर त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

या व्यक्तीने असे का केले, हे अजूनही समजू शकलेले नाही. तो नशेत होता की, त्याने फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य केले, हे स्पष्ट नाही. पण त्याच्या या धोकादायक कृत्यामुळे होर्डिंगखाली मोठी गर्दी जमली. लोक मोठ्याने ओरडून त्याला खाली उतरण्याचे आवाहन करत होते, पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता.

Shocking Video Viral
Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

बचाव कार्यासाठी क्रेन बोलवावी लागली

दरम्यान, या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी अखेर बचाव पथकाला बोलावण्यात आले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्याला वाचवण्यासाठी एक मोठी क्रेन घटनास्थळी बोलवण्यात आली. क्रेनच्या मदतीने काही लोक होर्डिंगवर चढून त्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओतील थरारामुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर @NazneenAkhtar23 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे सर्व काय पाहायला मिळत आहे, आधी वाटलं कोणत्या चित्रपटाचे (Movie) शूटिंग सुरु आहे, पण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळलं की हा तर रिॲलिटी शो सुरु आहे.”

Shocking Video Viral
Viral Video: iPhone 17 खरेदीवरून तुफान हाणामारी! 'आधी मला, आधी मला' म्हणत ग्राहकांनी घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक या व्यक्तीच्या जीवाच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याच्या अशा विचित्र वागण्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com