Viral Video: राडा, राडा! पठ्ठ्यानं चालत्या गाडीच्या छतावर मारले 'पुशअप', व्हिडीओ व्हायरल झाल्यावर...

Viral Video: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पण त्यामुळे या स्टंटबाजांना काही फरक पडत नाही.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पण त्यामुळे या स्टंटबाजांना काही फरक पडत नाही. 'इन्स्टाग्राम रील' करण्यामध्ये लोक केवळ आपला जीव धोक्यात घालत नाहीत, तर इतरांच्या जीवाशीही खेळत आहेत.

असाच एक प्रकार गुरुग्राममधून समोर आला आहे. येथे काही मुले मद्यधुंद अवस्थेत चालत्या गाडीवर स्टंट करताना दिसली. तरुणांची ही कृती पाहून लोक थक्क झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या मुलांवर कारवाई करत 6,500 रुपयांचा दंड ठोठावला.

दारुच्या नशेत मुलगा कारच्या छतावर चढला

दरम्यान, ही घटना हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथे 5 मुलं दारुच्या नशेत अल्टो कारवर स्टंट करत होती. त्यापैकी एकजण गाडीच्या छतावर पुशअप मारत होता. तर इतर मुले खिडकीतून लटकलेली दिसली.

या 18 सेकंदाच्या क्लिपमध्ये, आपण पांढऱ्या अल्टो कारमधील काही मुले खिडकीतून लटकताना पाहू शकतो. तिथे एक मुलगा गाडीच्या छतावर चढून पुशअप मारत आहे. यानंतर, मुलगा गाडीच्या छतावर बसून नाचू लागतो.

Viral Video
Viral Video: 10 रुपयाच्या पैजेसाठी पठ्ठ्यानं केलं 'हे' काम, पोलिसांनी ठोठावला 3,500 रुपयांचा दंड!

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे

अल्टो कारच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला असे म्हणताना ऐकू येते – ये चल रहा है... गुडगांव में, मतलब मस्त चलती गाडी पर भाई ये... देखो... क्या बोला जाए भाई इसको? त्यानंतर व्हिडिओ संपतो.

हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे शेअर केला जात आहे. 'प्रदीप दुबे' (@dubey_100) नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

त्याने 'गुडगाव पोलिसांना टॅग करत लिहिले - त्यांना ना कोणाच्या जीवाची पर्वा आहे ना... दुसरीकडे, काही लोक व्हिडिओवर कमेंट करत त्या मुलांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com