Mission 2024: आता प्रत्येक राज्यात 'खेला होबे'; ममता बॅनर्जी वाटणार फुटबॉल

भाजपने (BJP) आमचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे काम केले असल्याचा आरोप सुद्धा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी केला आहे.
TMC President and West Bengal Chief Minister Mamata banerjee
TMC President and West Bengal Chief Minister Mamata banerjee
Published on
Updated on

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता 'मिशन 2024' ची तयारी करत असल्याचे दिसते आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची घोषणा करताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “मोदी सरकार सत्तेतून हद्दपार होईपर्यंत प्रत्येक राज्यात 'खेला' होईल.” 'खेल होबे' हा नारा देऊन बंगालमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांनी 16 ऑगस्टला 'खेल दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने गरीब मुलांना फुटबॉलचे वितरण करण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. (Mamata Banerjee has now started preparations for Mission 2024)

ममता म्हणाल्या, “आज आपले स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. भाजपने आमचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे काम केले आहे. (मोदी सरकार) आपल्याच मंत्र्यांवर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांच्या हेरगीरीसाठी एजन्सींचा गैरवापर करते."

'संपूर्ण देश आणि जगाच्या आशीर्वादाने बंगालमधील विजय'

पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल देशातील जनतेचे अभिनंदन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला संपूर्ण देश आणि जगाकडून आशीर्वाद मिळाला. आम्हाला देश आणि राज्यातील जनतेचे अभिनंदन करायचे आहे. आम्ही मनी पावर, मसल पावर आणि सर्व एजन्सीजच्या विरोधात लढा दिला. सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही आम्ही जिंकलो कारण बंगालच्या लोकांनी आम्हाला मत दिलं आणि देशाने आणि जगाने आम्हाला आशीर्वाद मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com