
मेजर लीग क्रिकेटचा तिसरा हंगाम सध्या अमेरिकेत आयोजित केला जात आहे. चालू स्पर्धेतील दुसरा सामना कॅलिफोर्नियातील ओकलंड कोलिझियम येथे एमआय न्यू यॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टेक्सासकडून खेळणाऱ्या फाफ डू प्लेसिसने एक शानदार कॅच घेतला. या सामन्यात फिटनेसचे उत्तम दृश्य सादर करत ४० वर्षीय फाफने एक अद्भुत कॅच घेतला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
फाफ डू प्लेसिसने एमआयएनवायच्या डावाच्या १४ व्या षटकात हा कॅच पकडला. डावाची १४ षटक टेक्सासच्या ॲडम मिल्ने टाकत होता. त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलने एक शॉट मारला, परंतु ३० यार्डच्या वर्तुळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या फाफने हवेत उडत एका हाताने एक अद्भुत कॅच घेतला.
फाफ डू प्लेसिसचा हा कॅच पाहून स्वतः मायकेल ब्रेसवेल आश्चर्यचकित झाला आणि त्याने दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
फाफ डू प्लेसिस या सामन्यात फलंदाजीत काही खास करू शकला नाही आणि तो १५ चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. तथापि, त्याने ब्रेसवेलला झेल देऊन संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टेक्सास सुपर किंग्जने एमआय न्यू यॉर्कचा ३ धावांनी पराभव केला. सामन्यात टेक्सास सुपर किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. डेव्हॉन कॉनवे आणि कॅल्विन सॅव्हेज यांच्या अर्धशतकी खेळीमुळे त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, एमआय न्यू यॉर्कनेही धावांचा पाठलाग करताना चांगली कामगिरी केली. एकेकाळी त्यांचा विजय जवळजवळ निश्चित वाटत होता, परंतु त्यांना शेवटच्या षटकात पराभव स्वीकारावा लागला. एमआय न्यू यॉर्ककडून मोनांक पटेलने ४४ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली.
याशिवाय मायकल ब्रेसवेलने ३८ धावांचे योगदान दिले. पण शेवटी, एमआय न्यू यॉर्कला २० षटकांत ८ गडी गमावून फक्त १८२ धावा करता आल्या. एमआय न्यू यॉर्कला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.