काश्मीर आणि दहशतवाद हे समिकरण अद्याप बदलले नाही. मात्र भारतीयांना काश्मीरबाबत दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. 2022 या एका वर्षात 100 दहशतवाद्यांना भारतीय सैन्यदलाने यमसदनी धाडले. त्यामूळे गेल्या काही वर्षात दहशतवाद आणि त्यांच्यावर होणारी कारवाई यात मोठी तफावत आहे. त्यामूळे गेल्या पाच महिन्यातील सैन्यदलाने घेतलेला आक्रमक पवित्रा स्वागतार्ह आहे. ( Major increase in counter-terrorism operations in Kashmir )
मिळालेल्या माहितीनुसार 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मोठा धक्का दिला आहे. काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या 160-180 दहशतवाद्यांपैकी 12 जूनपर्यंत सुरक्षा दलांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 5 महिन्यांमध्ये गेलेल्या 100 दहशतवाद्यांपैकी 71 स्थानिक आहेत. तर 29 विदेशी दहशतवादी आहेत, सर्व पाकिस्तानी नागरिक आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाला सर्वाधिक फटका बसला असून, त्यात 63 दहशतवादी मारले गेले आहेत.
खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जैश-ए-मोहम्मदच्या म्हणजे 24 दहशतवाद्यांचा समावेश होता. तसेच जैश-ए-मोहम्मदने 24 दहशतवादी गमावले आहेत, बाकीचे अन्सार-गजवातुल हिंद आणि ISJK चे आहेत. असे असताना गेल्या वर्षी म्हणजेच 2021 या वर्षी 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामूळे काश्मीरमधील दहशतवाद्यांवरील कारवाईचा आकडा वाढला असला तरी दहशतवाद ही संकल्पना समूळ संपवण्यासाठी काय करता येईल यावर गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.