Swiggy: 'मुस्लिम डिलीवरी बॉय नको' ग्राहकांच्या डिमांडवर मोईत्रांचा संताप

Food Delivery: स्विगीने अशा ग्राहकांची यादी जारी करून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे
Food Delivery| Swiggy
Food Delivery| SwiggyDainik Gomantak
Published on
Updated on

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी हैदराबादमधील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या एका ग्राहकाला 'मुस्लिम डिलिव्हरी बॉय नको' अशा सूचना लिहून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. स्विगीने अशा ग्राहकांची यादी जारी करून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे. तसेच त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करावा, असे त्या म्हणाल्या. हैदराबादच्या ग्राहकाचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. (Mahua Moitra on Swiggy Viral Message)

हैदराबादमधील एका ग्राहकाने त्याचे जेवण ऑर्डर केले आणि त्यानंतर स्विगीला (Swiggy) मेसेज केला की, 'डिलिव्हरी बॉय मुस्लिम नसावा'. या मॅसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक त्यावर शेअर करून टीका करत आहेत. त्याचवेळी आता महुआ मोइत्रा यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनीही अशा विनंतीचा निषेध केला आहे. स्विगीला जबाबदारी घेण्यास सांगितले. त्यांनी प्रश्न केला, "प्लॅटफॉर्म कंपन्यांनी अशा प्रकरणांवर लक्ष ठेवले पाहिजे कारण, गिग कामगारांना धर्माच्या नावाखाली अशा कट्टरतेचा सामना करावा लागतो. कंपन्यांनी त्यांच्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कारवाई केली पाहिजे."

शेख सलाउद्दीनच्या ट्विटनंतर ही पोस्ट व्हायरल झाली

स्विगीला ग्राहकाच्या वैयक्तिक विनंतीचा स्क्रीनशॉट तेलंगणा राज्य टॅक्सी आणि ड्रायव्हर्स संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शेख सलाउद्दीन यांनी शेअर केल्यानंतर व्हायरल झाला आहे. मुस्लिम डिलिव्हरी बॉयला न पाठवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि तपशीलही यात शेअर केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "आम्ही डिलिव्हरी कामगार प्रत्येकाला अन्न पोहोचवण्यासाठी येथे आहोत, मग ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असो".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com