एमएस धोनीच्या याचिकेवर HC चा मोठा निर्णय; IPS अधिकाऱ्याला सुनावली तुरुंगवासाची शिक्षा

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात अधिकाऱ्याला अपील करण्याची संधी देत ​​शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. संपत कुमार या वर्षी मे महिन्यात निवृत्त झाले.

दरम्यान, धोनीने 2014 च्या आयपीएल सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि एका टीव्ही चॅनेलच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर धोनीने हे पाऊल उचलले होते. त्यावेळी, संपत कुमार तामिळनाडू पोलिसांच्या सीआयडी विभागात तैनात होते. धोनीने संपत कुमार यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यात त्याने संपत कुमार यांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचे म्हटले होते.

Court
Madras High Court: 'न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांचेच फोटो...', मद्रास HC चा आदेश

दुसरीकडे, सट्टेबाजी प्रकरणाचा प्राथमिक तपास संपत कुमार यांनी केला होता. मात्र त्यांच्यावर काही बुकींकडून लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना या प्रकरणाच्या तपासातून काढून टाकून निलंबित करण्यात आले होते. मात्र, 2019 मध्ये ट्रायल कोर्टाने त्यांना निर्दोष घोषित केले होते. यानंतर संपत कुमार यांनी हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून आपल्याला गोवण्यात आल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court POCSO ruling
bombay high court goa bench
Husband Legal Obligation Wife Maintenance
Bombay High Court Goa Bench Judgment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com