
Maha Kumbh Mela 2025 Ends on Mahashivratri in Prayagraj with Grand Celebrations Viral Video
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित भव्य महाकुंभमेळ्याचा शिवरात्रीच्या रात्री म्हणजेच बुधवारी (26 फेब्रुवारी) शेवट झाला. 13 जानेवारी रोजी सुरु झालेला महाकुंभमेळा 45 दिवस चालला. 45 दिवसांत 66.21 कोटी भाविकांनी भव्य महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. बुधवारी शेवटचे पवित्र स्नान झाले. हिंदूंमध्ये एक महत्त्वाचा सण मानला जाणारा कुंभमेळा केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. महाकुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. याशिवाय, मोठ्या संख्येने परदेशी लोकांनीही हजेरी लावली होती.
दरम्यान, बुधवारी (26 फेब्रुवारी) शेवटच्या स्नानाच्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने मोठ्या आतिषबाजीने महाकुंभमेळ्याचा शेवट केला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक भव्य लेझर शो दिसतोय, ज्याने भाविकांना मंत्रमुग्ध केले. हे दृश्य पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्संनी योगी सरकारचे तोंडभरुन कौतुक केले.
मुख्यमंत्री आदित्यनाथ आज (27 फेब्रुवारी) महाकुंभ 2025 चा औपचारिक समारोप करतील. प्रयागराजच्या त्यांच्या सात तासांच्या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतील. याशिवाय, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीम महाकुंभ दरम्यान केलेल्या चार विक्रमांसाठी प्रमाणपत्रे प्रदान करेल. मुख्यमंत्री 10 स्वच्छता कामगार आणि 10 आरोग्य कर्मचाऱ्यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करतील. याशिवाय, 1000 स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छ कुंभ निधी आणि आयुष्मान योजनेचे प्रमाणपत्र दिले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.