मध्यप्रदेशात तबला वादनाचा 'विश्वविक्रम', 1500 वादकांनी केले अनोखे सादरीकरण, VIDEO

Tansen Music Festival: ग्वाल्हेर येथे आयोजित 99 व्या तानसेन समारंभात, 1500 तबलावादकांनी 'ताल दरबार' कार्यक्रमात अनोखे सादरीकरण केले आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला.
Tansen Music Festival Gwalior
Tansen Music Festival GwaliorDainik Gomantak
Published on
Updated on

Tansen Music Festival Gwalior: मध्य प्रदेशात सोमवारी तबला वादनाचा अनोखा कार्यक्रम झाला. ग्वाल्हेर येथे आयोजित 99 व्या तानसेन समारंभात, 1500 तबलावादकांनी 'ताल दरबार' कार्यक्रमात अनोखे सादरीकरण केले आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला. विशेष म्हणजे, या समारंभाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. संगीत सम्राट तानसेन यांना आदरांजली वाहताना, 1500 तबलावादकांनी ग्वाल्हेर किल्ल्यावर सूर, लय आणि ताल यांचा अनोखा मिलाफ साधला. कोलकाता, मुंबई, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह 50 हून अधिक शहरांतील तबलावादकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नरेंद्र तोमरही उपस्थित होते.

दरम्यान, राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडलवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या समारंभात तानसेन सन्मान आणि 2022 सालचा राजा मानसिंग तोमर सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशाने प्रोत्साहित होऊन सरकारने 25 डिसेंबर हा 'तबला दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंडित गणपती भट्ट हसनिग यांना त्यांच्या गायनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तानसेन पुरस्कार तर उज्जैन येथील मालव लोककला केंद्राला राजा मानसिंग तोमर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या उस्ताद अलाउद्दीन खान संगीत आणि कला अकादमीतर्फे जिल्हा प्रशासन ग्वाल्हेर यांच्या सहकार्याने 22 ते 26 डिसेंबर दरम्यान तानसेन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tansen Music Festival Gwalior
MP Assembly Polls 2023: भाजपकडून तीन केंद्रीय मंत्री मैदानात, मध्य प्रदेश विधानसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, ''1,500 तबला वादकांनी एकत्र येऊन विश्वविक्रम केला आहे. हा कार्यक्रम संस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस आहे. हा संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न सरकारने केला. आता राज्य सरकार 25 डिसेंबर हा 'तबला दिन' म्हणून साजरा करणार आहे. सूर सम्राटची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरमध्ये दरवर्षी तानसेन समारंभ आयोजित केला जातो, ज्यामध्ये देश-विदेशातील संगीतप्रेमी आणि कलाकार सहभागी होतात.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com