Tamil Nadu: संकटांवर मात करत एम. सांगवीने NEET परीक्षेत मिळवले भरघोस यश

तामिळनाडूच्या नानजप्पनुर गावात 20 वर्षांच्या एम. सांगवीपूर्वी (M. Sangvi) कोणीही 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले नाही.
M. Sangvi
M. SangviDainik Gomantak
Published on
Updated on

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील एका गावात देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी 12वी आणि नंतर राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (NEET) उत्तीर्ण होणारी पहिली विद्यार्थिनी बनण्याचा मान एम. सांगवीने मिळवला आहे. तिच्याकडे आज संपूर्ण गाव आदर्श म्हणून पाहत आहे. तामिळनाडूच्या नानजप्पनुर गावात 20 वर्षांच्या एम. सांगवीपूर्वी (M. Sangvi) कोणीही 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले नाही.

दरम्यान, सांगवी अनुसूचित जमातीमधून येते. ती 12वी उत्तीर्ण होणारी पहिली विद्यार्थिनी तर ठरलीच पण त्याचबरोबर NEET 2021 मध्ये उत्तीर्ण होऊन उत्तम कामगिरी केली. अशी कामगिरी करणारी ती पहिली आदिवासी मालासर (Tribal Malasar) समाजातील मुलगी ठरली आहे. आपल्या अनोख्या संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालासर समाजात मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्याची छान परंपरा आहे. परंतु सांगवीने पाहिलेल्या स्वप्नाने त्यांच्या समाजाला दीर्घकाळ आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली.

M. Sangvi
जगातील सर्वात लोकप्रिय नेता पीएम मोदी

मुलीच्या अभ्यासावर कोणताही परिणामन होऊ दिला नाही

सांगवीला डॉक्टर बनण्याची आकांक्षा आहे. संघर्षशील परिस्थितीमध्ये अथक परिश्रम करुन ध्येय साध्य करण्याच्या आवेशाने ती निश्चितपणे "डॉ. एम. सांगवी" असे तिचे नाव लिहिणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.सांगवीच्या नानजप्पनुर गावात सुमारे 40 कुटुंबे राहतात. या कुटुंबापैकीच एक कुटुंब सांगवीचे आहे. यामध्ये ती आई वसंतमणी आणि वडील मुनिप्पन यांच्यासोबत कच्च्या झोपडीत राहत होते. शेतात मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याने मुलीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. तिने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त करताच मुनिप्पनने तिला प्रोत्साहन दिले.

2018 मध्ये बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सांगवीने पिचनूर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात 2017-18 मध्ये NEET साठी परीक्षा दिली, परंतु पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली होती. पुढच्या वर्षी ती NEET साठी उपस्थित राहू शकली नाही कारण मुनियप्पन आजारी पडले. आणि त्याच दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे, डोळ्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या वसंतमणी यांना शस्त्रक्रियेनंतर कमी दिसू लागले.

M. Sangvi
पीएम मोदी गांधी जयंतीला जल जीवन मिशन योजनेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद

राज्य मंडळ आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने घेतलेली पुस्तके

कोविड महामारीचा कहर शिगेला पोहोचला असताना नानजप्पनुरमध्ये मदत कार्यात गुंतलेल्या काही लोकांनी आदिवासीबहुल नानजप्पनुर गावात मदत साहित्य आणले. याच काळात सांगवीच्या अभ्यासाचा आवेश त्यांना कळला. त्यांनी सांगवीला मदत केली. राज्य मंडळ आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सांगवीने पुस्तके घेतली आणि NEET परीक्षेच्या 2021 च्या दुसऱ्या प्रयत्नात 720 पैकी 202 गुण मिळवले. याआधी तिला या परीक्षेसाठी सामुदायिक प्रमाणपत्र मिळणे खूप अवघड होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले.

गावातील लोक आजाराशी झुंजताना पाहणाऱ्या सांगवीला डॉक्टर बनून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. यासाठी तिला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळण्याची आणि तामिळनाडू सरकारकडून आर्थिक मदतीची इच्छा आहे. SC आणि ST उमेदवारांची कट ऑफ टक्केवारी 108 ते 137 गुणांच्या दरम्यान असून सांगवीला 202 गुण मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com