Ludhiana Gas Leak Video: लुधियानाच्या गियासपुरा भागात गॅस गळती, 9 ठार, 11 जणांची प्रकृती गंभीर!

Ludhiana Gas Leak: पंजाबमधील लुधियाना येथील एका कारखान्यात गॅस गळती होऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ludhiana Gas Leak Video
Ludhiana Gas Leak VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Ludhiana Gas Leak: पंजाबमधील लुधियाना येथील एका कारखान्यात गॅस गळती होऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

एक किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. अनेक लोक बेहोश झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

लुधियानाच्या निवासी भागात गॅस गळती

लुधियाना पोलिसांनी (Police) सांगितले की, शहरातील गियासपुरा भागातील एका कारखान्यातून गॅस गळती होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 11 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गळतीनंतर अनेकांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेरपूर चौकाजवळील सुवा रोडवर असलेल्या कारखान्यात गॅस गळती झाली. डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

याशिवाय, रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. भटिंडा येथून एनडीआरएफची (NDRF) टीमही रवाना झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही गॅस गळती गोयल मिल्क प्लांटमध्ये झाली.

तसेच, गॅस गळतीनंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे येथे उपस्थित नागरिकांनी सांगितले. लोकांना समजल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली. लोकांनी त्या भागातून पळ काढला. एका व्यक्तीने सांगितले की, गॅसमुळे अनेकांचे शरीर निळे पडले आहे.

दुसरीकडे, पोलिसांनीही स्थानिकांना तेथून जाण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर या भागात येणे धोक्याचे ठरु शकते, असेही सांगण्यात आले आहे. गॅस गळतीच्या ठिकाणापासून 300 मीटरच्या परिघात असलेल्या लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. अनेक सामाजिक संस्थाही लोकांच्या मदतीसाठी सक्रिय झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com