लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. जर्मनीमध्ये पोलिसांनी बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेशी संबंधित दहशतवादी जसविंदर सिंग मुलतानी याला अटक केली आहे. जसविंदर सिंग हा लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. जसविंदर सिंग दिल्ली आणि मुंबईतही दहशतवादी (Terrorist) हल्ले घडवून आणण्याची योजना आखत होता. याच आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
45 वर्षीय जसविंदर सिंग हा एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूच्या जवळचा मानला जातो. जसविंदरवर फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही आहे. जसविंदर सिंग मुलतानी यांनीच सिंघू सीमेवरील शेतकरी (Farmers) नेते बलवीर सिंग राजेवाल यांच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने जीवन सिंग नावाच्या व्यक्तीला भडकावले होते. हत्येचे हत्यार मध्य प्रदेशातील जीवनसिंग याने दिले होते. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जीवन सिंगला अटक केली होती.
सूत्रांनी सांगितले की, पहिल्यांदाच मुलतानीचे नाव एखाद्या प्रकरणात स्पेशल सेलसमोर आले होते. विशेष सेलने ही माहिती केंद्रीय यंत्रणांना दिली होती. यासोबतच शेतकरी नेते राजेवाल यांनाही सुरक्षा घेण्यास सांगण्यात आले. 23 डिसेंबर रोजी लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये बॉम्बस्फोट (Bomb blast) झाला होता. हा स्फोट आयईडीने करण्यात आला. आयईडीच्या वापरामुळे हा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. या स्फोटामागे ज्याचा मृत्यू झाला त्याचाच हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. तो टॉयलेटमध्ये बॉम्ब एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतानाच स्फोट झाल्याचा संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.