Love Jihad: 'आधी फेसबुक फ्रेंडशी मैत्री, नंतर बलात्कार...' गोमांस खाऊ घालून नराधमाने केले धर्मांतर

Love Jihad: देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे.
Love Jihad
Love JihadDainik Gomantak

Love Jihad: देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणाने सर्वप्रथम ओळख लपवून आपल्या फेसबुक फ्रेंडशी मैत्री केली.

प्रेमाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला गोमांस खाऊ घालून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात पीडितेने गाझियाबादमधील विजय नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालिद चौधरी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत.

दरम्यान, गाझियाबाद (Ghaziabad) पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विजय नगर पोलिस स्टेशन परिसरातील मिर्झापूर येथे राहणाऱ्या पीडितेने सांगितले की, 2020 मध्ये दीपक नावाच्या तरुणाने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिने रिक्वेस्ट स्वीकारली.

पीडितेने पुढे सांगितले की, सुरुवातीला आरोपी तिला अधूनमधून मेसेज करत असे, तर तिने काही मेसेजला रिप्लाय दिल्यावर आरोपी तिच्याशी मेसेंजरवर चॅट करु लागला.

तब्बल सहा महिन्यांनी त्यांची भेट झाली. भेटी वाढू लागल्यानंतर एके दिवशी तिला कळले की आरोपीचे नाव दीपक नसून खालिद चौधरी आहे.

Love Jihad
Love Jihad: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घाणेरडे व्हिडिओ बनवायचा, नंतर ब्लॅकमेल करुन...

पीडितेने पुढे सांगितले की, हे सत्य कळल्यानंतर ती आरोपीपासून दूर जाऊ लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आरोपीने (Accused) आता तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

यादरम्यान आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कारही केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. त्यानंतरही आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता. त्यामुळे तिच्या पोटात वाढणारे मूल आतमध्येच दगावले.

पीडितेने पुढे असेही सांगितले की, तिने आरोपीवर लग्नासाठी अनेकदा दबाव टाकला, परंतु आरोपीने तिला आधी इस्लाम स्वीकारण्यास सांगितले आणि अनेकदा तिला निजामुद्दीन मशिदीत नेले.

एवढेच नाही तर आरोपीने तिला एक दिवस वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावून तिच्या कमरेवर 'खालिद' असे नाव गोंदवले. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितले की, आरोपी खालिद तिला नेहमी हिजाब घालून बाहेर जाण्यास भाग पाडत असे. एवढचं नाही तर गोमांसासह अनेक प्राण्यांचे मांस खायला द्यायचा. यानंतर आरोपीनी तिचे धर्मांतर करुन तिचे नावही बदलले.

Love Jihad
Love Jihad in Uttar Pradesh: धर्म बदलून अल्पवयीन हिंदू मुलीसोबत करायचं होतं लग्न; त्यानंतर जे घडलं त्यावर...!

पीडितेने पुढे सांगितले की, जेव्हा तिने नाव बदलण्यास विरोध केला तेव्हा आरोपीने सांगितले की, तो अशा प्रकारे हिंदू मुलींना प्रेमात अडकवतो. हे करण्यासाठी त्याला वरुन आदेश मिळतात. गाझियाबाद पोलिसांचे एसीपी निमिष पाटील यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर विजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com