राजस्थान पाण्यात; लोकसभा अध्यक्ष स्वत: उतरले मैदानात

राजस्थानमधील कोटा-बुंडी मतदार संघाचे खासदार असलेल्या ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्वत: बोटीमध्ये बसुन या परिस्थितीची पहाणी केली आहे.
Lok sabha Speaker Om Birla in Rajasthan
Lok sabha Speaker Om Birla in Rajasthan Dainik Gomantak
Published on
Updated on

सध्या देशात अनेक ठिकाणी पावसामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मिर, उत्तराखंड आणि बऱ्याच ठिकाणी पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारकडून आपग्रस्त भागांत मदकार्यासाठी मदत पाठवली आहे. त्यातच आता लोकसभेचे अध्यक्ष (Speaker of Lok sabha) ओम बिर्ला (Om Birla) यांनी देखील पुरग्रस्त भागात जात पाहणी केली आहे. कोटा शहरातील सांगोड मध्ये ओम बिर्ला यांनी बोटीमधून या सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे. (Lok sabha speaker om birla visited rajasthan flood affected area)

राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसांपासून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाण्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजस्थानमधील कोटा-बुंडी मतदार संघाचे खासदार असलेल्या ओम बिर्ला यांनी स्वत: बोटीमध्ये बसुन या परिस्थितीची पहाणी केली आहे.

यावेळी ओम बिर्ला यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर, ‘लोकांचे मोठे नुकसान झाले असुन परिस्थिती गंभीर आहे. हाडोतीमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचेही नुकसान झाले असल्याची प्रतिक्रीया ओम बिर्ला यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com