देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज तीन लाखांच्या वर कोरोना रुग्ण देशामध्ये आढळून येत आहेत. कोरोनाची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची टीका विरोधी पक्ष करत असताना आता थेट भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subrmanian Swami) यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय काहीचं कामाचं नसल्यामुळे कोरोना स्थिती हाताळण्याची सगळी जाबबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांचे सहकारी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे द्यावी अशी मागणी स्वामी यांच्याकडून करण्य़ात आली आहे. सध्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन(Harshvardhan)हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Let Nitin Gadkari lead the fight against Corona)
‘’ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यवादानंतरही जसा टिकून राहीला तसा आताही कोरोना महामारीचा सामना करुन नक्कीच टीकेल. आता आपण योग्य ती काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर लहान मुलांवर परिणाम करणारी आणखी लाट आपल्याकडे येईल. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या विरुध्द सुरु असलेल्या लढाईचं नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावं. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहण्याचं काही एक कारण नाही,’’ असं स्वामी यांनी आपल्या सोशल मिडियावरील ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्याचबरोबर अन्य एका ट्विटमध्ये मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केलं असून तो एक केवळ विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे देशाचे पंतप्रधान नाहीत हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं, असंही स्वामींनी म्हटलं आहे. तसेच स्वामी यांच्या ट्विटवर सध्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्शवर्धन यांना पदावरुन बडतर्फ करण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं. ‘’नाही डॉ. हर्षवर्धन यांना मोकळ्यापणाने काम करु दिलं जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांपैकी ते नसून ते खूपचं नम्र आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत काम केल्यास त्यांचा हा गुण चांगलाच बहरु शकतो,’’ अशी आपेक्षा स्वामींनी व्यक्त केलीय.
नितीन गडकरींना कोरोनाविरुध्द लढाईचा सर्व कारभार देण्यात यावा या स्वामींच्या मागणीला अनेक नेटकऱ्यांनी आपली सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे ट्विटरवर गडकरी हा शब्द ट्रेंड होत आहे. स्वामींनी सुचवलेला पर्याय अगदी योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, लेखक आणि अभिनेत्या असणाऱ्या सुशील सेठ यांनीही नितीन गडकरींना या कामासाठी नियुक्त केलं पाहीजे अशी मागणी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट केलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.