हरियाणातील पानिपतमध्ये बिबट्याने पोलीस आणि वनविभागाच्या टीमवरच हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वनविभाग आणि पोलिसांचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी पोहोचल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो एकापाठोपाठ एकावर हल्ला करताना दिसत आहे. (leopard attack in panipat haryana viral video)
वनविभाग व पोलीस लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बिबट्या अनियंत्रित दिसत आहे. मात्र, अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. हा व्हिडिओ पानिपतचे एसएसपी शशांक कुमार सावन यांनीही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले, 'वन विभाग आणि पोलिसांच्या टीमसाठी कठीण दिवस... यातील काही लोक जखमी झाले, या लोकांच्या शौर्याला सलाम... शेवटी सगळे सुखरूप आहेत... बिबट्याही. ..'
'पोलिसांचे काम किती जोखमीचे आहे, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होते. त्यापेक्षा कधी कधी मोठे आव्हान तुमच्यासमोर उभे असते आणि तुम्ही तुमची पाठ दाखवू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक (सुमारे 34000) पोलिसांचे प्राण गेले! पोलिसांना हवा तो सन्मान कधी मिळणार? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
पानिपत पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही बिबट्याशी सामना करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पानिपतमधील यमुना नदीला लागून असलेल्या अतौलापूर गावात शनिवारी संध्याकाळी उशिरा बिबट्या आला होता. सुमारे साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला नियंत्रणात आणण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.