धूक्याने केला कहर: यमुना एक्सप्रेसवे वर भीषण अपघात

Havoc caused by fog Yamuna Expressway Terrible Accident
Havoc caused by fog Yamuna Expressway Terrible Accident
Published on: 
Updated on: 

ग्रेटर नोएडा: उत्तर प्रदेशात धुक्याचा कहर पाहायला मिळाला आहे. यमुना एक्स्प्रेस वे वर शनिवारी सकाळी सहा पेक्षा अधिक अधिक वाहने एकत्र आली. या अपघातात 12 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे ग्रेटर नोएडा येथील दानकौर पोलिस स्टेशन परिसरातील यमुना एक्स्प्रेस वे वर 6 वाहने धडकली. सुमारे 12 लोक जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी रस्त्यावरुन वाहने हटवून जाम मोकळा केला.

या अपघातात डबल डेकर बसचेही नुकसान झाले आहे. एसीपी पोलिस दलासह घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने यमुना एक्सप्रेस वेवरुन धडकलेला वाहने काढण्यात आली आहेत. जखमींना कांशीराम रुग्णालय आणि कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याचवेळी उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यात शनिवारी सकाळी दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. मैनपुरी आणि फिरोजाबाद सीमेजवळील आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे वर सुमारे 10 वाहनांची चकमक झाली. या अपघातात बरेच लोक जखमी झाल्याची माहिती आहे. दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही वाहनांमध्ये प्रवासी अजूनही अडकले आहेत. 

माहिती मिळताच मैनपुरी व फिरोजाबादची पोलिस दलाची घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमी प्रवाशांना वाहनांमधून बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. अनेक जखमी प्रवाशांना सैफई येथे रेफर करण्यात आले आहे. लखनौ एक्सप्रेस वेच्या 77 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. घटनास्थळी वाहने काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आल्या आहेत. सर्व वाहने आग्रा येथून लखनौकडे जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com