'लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले की तो मूसवालाचा मास्टरमाइड आहे', पंजाब पोलिसांचा दावा

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले आहे की पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे तो मास्टरमाईंड होता आणि गेल्या ऑगस्टपासून मुसेवालाच्या हत्येची योजना आखत होता.
Lawrence Bishnoi
Lawrence BishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाब पोलिसांचे एडीजीपी प्रमोद बन यांनी गुरुवारी सांगितले की गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) कबूल केले आहे की पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येमागे तो मास्टरमाईंड होता आणि गेल्या ऑगस्टपासून मुसेवालाच्या हत्येची योजना आखत होता. (Lawrence Bishnoi admits he is Sidhu Moose Wala mastermind claims Punjab police)

Lawrence Bishnoi
पंजाबचे पूर्व DGP दिनकर गुप्ता यांची NIA प्रमुखपदी वर्णी

आणखी एक आरोपी बलदेव उर्फ ​​निक्कू याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुंडविरोधी टास्क फोर्सचे प्रमुख बन यांनी दिली आहे. सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने गायक आणि 423 लोकांची सुरक्षा कमी केली होती.

बॅन म्हणाले की, "आम्ही या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला नुकतेच अटक केली होती आणि बिश्नोईला कोठडीत 27 जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. बिश्नोईने कबूल केले आहे की तो (मुसेवालाच्या हत्येचा) मास्टरमाईंड होता.” एडीजीपी म्हणाले की, “हत्येचा कट गेल्या वर्षी ऑगस्टपासून रचला जात होता.

Lawrence Bishnoi
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाल्यासच SC-ST कायदा लागू होईल: कर्नाटक उच्च न्यायालय

पुढे एडीजीपी म्हणाले की आमच्या माहितीनुसार तीनदा रेकी करण्यात आली. जानेवारीमध्येही शूटर्सचा एक वेगळा गट मुसेवालाला मारण्यासाठी आला होता, पण त्यात आम्हाला यश आले नाही.

बिश्नोईने असेही सांगितले की, मुसेवालाच्या हत्येसाठी वापरलेल्या गाडीमध्ये फतेहाबाद पेट्रोल पंपावरील 25 मे रोजीची पावती सापडली होती, त्यानंतर पंजाब पोलिसांनी "फतेहाबाद पेट्रोल पंपावरून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज लिंक जोडल्या" असे बन म्हणाले. तेथून आम्ही आरोपी प्रियव्रत उर्फ ​​फौजी याची ओळख आम्हांला पटली. आम्ही आतापर्यंत 13 जणांना अटक केली असून संपूर्ण कटाचा पर्दाफाश झालेला आहे.

गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी गेल्या आठवड्यात दिल्लीतून चौकशीसाठी आणलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या पोलीस कोठडीत मानसा न्यायालयाने वाढ केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन शूटर्ससह तिघांना अटक केली होती. घटनेच्या वेळी त्यांच्यापैकी एक कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com