Lata Mangeshkar Merged Into Infinit
Lata Mangeshkar Merged Into InfinitDainik Gomantak

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
Published on

प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन (lata Mangeshkar Passed Away) झाले. लता मंगेशकर यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अनेक सेलिब्रेटींपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लता दीदींना अंतिम श्रद्धांजली वाहिली (Lata Mangeshkar Merged Into Infinit) आहे. लता दीदी आज अनंतात विलीन झाल्या.

Lata Mangeshkar Merged Into Infinit
राजकीय नेत्यांची लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती

'भारतरत्न' लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गायकांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. चाहत्यांचे डोळे यावेळी भरून आले. आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत. लता मंगेशकर यांचा मधुर आवाज त्यांच्या चाहत्यांच्या कानात गुंजतोय. आता हा आवाज कायमचा शांत झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com