Lakhimpur Kheri violence:मोदीजी तुमची नैतिकता कुठे गेली?,प्रियंका गांधींचा पंतप्रधानांना संतप्त सवाल

अटकेनंतर ऑडिओ जारी करून प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे (Lakhimpur Kheri violence)
Lakhimpur Kheri violence: Priyanka Gandhi attacks on Prime Minister Narendra Modi
Lakhimpur Kheri violence: Priyanka Gandhi attacks on Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

लखीमपूर खैरी हिंसाचारातील (Lakhimpur Kheri violence) पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना काल अखेर अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर ऑडिओ जारी करून प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे .या ऑडिओत प्रियंका गांधी म्हणाल्या की, ' शेतकऱ्यांनीच (Farmers) आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले. शेतकरी शहीद झाले आणि आजही शेतकऱ्याचा मुलगा सैनिक होऊन देशाच्या सीमेवर स्वातंत्र्याचे रक्षण करत आहे. जेव्हा एखादा शेतकरी संघर्ष किंवा चळवळीत आपला जीव गमावतो, तेव्हा आम्ही त्याला मृत म्हणत नाही. आम्ही त्याला शहीद म्हणतो.'(Lakhimpur Kheri violence: Priyanka Gandhi attacks on Prime Minister Narendra Modi)

देशात आज असे भ्याड सरकार आहे कीत्या सरकारचे गृहराज्यमंत्री हजारोंच्या सभेत जनतेला धमकी देतात. आणि त्यांचा मुलगा शेतकर्‍यांना गाडीच्या चाकाखाली चिरडतो आणि हे भ्याड सरकार या गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी विरोधी महिलाला रोखण्यासाठी आपले संपूर्ण पोलीस बळ लावते. हा अपघात झाला तेव्हा हे पोलीस कुठे होते? हे सरकार कुठे होते? हे प्रशासन कुठे होते? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की मोदीजी, मला तुम्हाला विचारायचे आहे, " तुमची नैतिकता कुठे आहे? एक जुना श्लोक आहे, ' लोकांचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे,' मोदीजी 100 किमी दूर अमृतोत्सव साजरा करण्यासाठी आले होते, परंतु शेतकऱ्यांचे अश्रू विचारायला लखीमपूर-खैरीला पोहोचले नाहीत. तुम्ही मला जितके जास्त दडपून टाकाल तितके आम्ही मजबूत होऊ. मी काँग्रेस सहकाऱ्यांना सांगते की, गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि त्यांच्या मुलाच्या अटकेपर्यंत संघर्ष सुरू राहील, माझ्या सुटकेनंतर मी तुम्हाला भेटेनच ."

Lakhimpur Kheri violence: Priyanka Gandhi attacks on Prime Minister Narendra Modi
Lakhimpur Kheri violence: अखेर प्रियांका गांधींना अटक

दरम्यान काल उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना सीतापूरमधील पीएसी अतिथीमध्ये ठेवण्यात आले आहे.रविवारी लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर त्याच रात्री प्रियांका गांधी लखनौला पोहोचल्या होत्या. तिथून त्या लखीमपूरला रवाना झाल्या मात्र सोमवारी पहाटे पोलिसांनी त्यांना हरगाव येथे रोखले. असे सांगण्यात आले की, प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या अटकेची बातमी येताच कॉंग्रेस समर्थकांनी पीएसी गेस्ट हाऊसच्या बाहेर गर्दी करायला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांच्या विरोधात कलम 151, 107 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. एसडीएम सीआरपीसीच्या कलम 116 अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे. प्रियांका सोमवारी सकाळपासून पीएसी गेस्ट हाऊसमध्ये होत्या. हे गेस्ट हाऊस तात्पुरते जेल बनवण्यात आले असून प्रियांका गांधी यांना अटक करुन तेथे ठेवण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांना 4 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com