Guinness World Record: लडाखने केला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, हाफ मॅरेथॉनचे आयोजन करुन...

Ladakh: लडाख केंद्र शासित प्रदेशाने 13,862 फूट उंचावर शून्य तापमानात 21 किमीची पहिली शर्यत यशस्वीपणे आयोजित करुन इतिहास रचला आहे.
Hal Marathon
Hal Marathon Dainik Gomantak
Published on
Updated on

Guinness World Record: लडाख केंद्र शासित प्रदेशाने 13,862 फूट उंचावर शून्य तापमानात 21 किमीची पहिली शर्यत यशस्वीपणे आयोजित करुन इतिहास रचला आहे.

जगातील सर्वात उंच गोठलेल्या सरोवरावरील हाफ मॅरेथॉन म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.

भारत (India) आणि चीनच्या सीमेवर 700 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या पेंगॉग सरोवराचे हिवाळ्यात तापमान उणे 30 अंश सेल्सिअस असते, त्यामुळे खाऱ्या पाण्याचे सरोवर बर्फाने गोठते.

लास्ट रन नाव दिले

लेह जिल्हा विकास आयुक्त श्रीकांत बाळासाहेब सुसे यांनी सांगितले की, चार तासांची मॅरेथॉन लुकुंग येथून सोमवारी सुरु झाली आणि मान गावात संपली. यात भाग घेतलेल्या 75 सहभागींपैकी कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

लोकांना हवामान बदल आणि हिमालय वाचवण्याची गरज याविषयी आठवण करुन देण्यासाठी 'लास्ट रन' या नावाने हे आयोजन करण्यात आले होते.

Hal Marathon
Earthquake: भूकंपाने हादरले लडाख, कारगिलमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

गिनीज बुक मध्ये नोंद

लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल, पर्यटन विभाग आणि लडाख (Ladakh) आणि लेह जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अॅडव्हेंचर स्पोर्ट्स फाऊंडेशन ऑफ लडाख (ASFL) ने मॅरेथॉनचे आयोजन केले होते. "पहिल्या पॅंगॉन्ग फ्रोझन लेक हाफ मॅरेथॉनची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंद झाली आहे," असे सुसे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com