Kumar Vishwas: कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर हल्ला! सुरक्षा रक्षकांनाही मारहाण

Kumar Vishwas Fleet Attacked: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Kumar Vishwas
Kumar VishwasDainik Gomantak
Published on
Updated on

Kumar Vishwas Fleet Attacked: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांच्यावर हिंडनजवळ हल्ला झाला आहे. या घटनेनंतर कुमार विश्वास यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करुन या घटनेबद्दल सविस्तर सांगितले. हल्लेखोरांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांवरही हल्ला केल्याचे वृत्त आहे.

कुमार यांनी सांगितले

कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिले की, अलिगढला जाण्यासाठी गाझियाबादमधील वसुंधरा येथून ते निघाले होते. वाटेत हिंडनजवळ त्यांच्या गाडीवर दोन्ही बाजूंनी हल्ला झाला. त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आरोपींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला.

यानंतर स्थानिक पोलिसांना (Police) या प्रकरणाची माहिती देण्यात आली. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. कुमार विश्वास यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना (यूपी पोलिस आणि केंद्रीय दलाचे कर्मचारी) देखील मारहाण करण्यात आली आहे.

Kumar Vishwas
जातीय जनगणनेनंतर नितीश कुमारांचा नवा डाव, बिहारमध्ये लागू होणार 75 टक्के आरक्षण!

कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांवर आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर पल्लव वायपेयी यांनी कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकांवर मारहाणीचा आरोपही केला आहे. कार ओव्हरटेक करण्यावरुन वाद झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्याचे सांगण्यात आले. समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी त्या व्यक्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Kumar Vishwas
Uttar Pradesh Crime: माणुसकी ओशाळली! 65 वर्षीय व्यक्तीने केला 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार अन् नंतर...

अलिगढमध्ये केव्ही नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार, अलिगढमध्ये आज (बुधवारी) KV नाईट (कुमार विश्वास नाईट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुमार विश्वास गाझियाबादहून (Ghaziabad) अलीगढला रवाना झाले होते. कार्यक्रमात कवी आणि कवयित्रीही सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com