Kissan GPT
Kissan GPTDainik Gomantak

Kissan GPT: आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार AI, Chat GPT ने लाँच केले चॅटबॉट

भारतीय शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी Kissan GPT नावाचा नवीन AI-चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे.
Published on

Kissan GPT: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रत्येक क्षेत्राची माहिती मिळत आहे. नुकतंच आलेलं एक तंत्रज्ञान म्हणजे चॅट जीपीटी. यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तर मिळतात.

यात नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. संगणक शास्त्रज्ञ प्रतीक देसाई यांनी किसान जीपीटी हा नवीन चॅटबॉट तयार केला आहे. कृषी प्रधान भारताला याचा मोठा फायदा होणार आहे. भारत एक कृषी पॉवरहाऊस असल्यामुळे हा AI चॅटबॉट केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरु शकतो.

शेतीत येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शेतातून अधिक उत्पादन काढण्यात या तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे.

  • काय आहे Kissan GPT

भारतीय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी KissanGPT नावाचा नवीन AI-चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे. संगणक शास्त्रज्ञ प्रतीक देसाई यांनी किसान जीपीटी हा नवीन चॅटबॉट तयार केला आहे. हा चॅटबॉक्स ९ भाषांमध्ये शेतीसंबंधित चर्चा करु शकणार आहे.

तुम्ही मातृभाषेत शेतीसंबंधित विषयांवर चर्चा करु शकणार आहे. शेतीत येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शेतातून अधिक उत्पादन काढण्यास हे तंत्रज्ञान मदत करु शकणार आहे.

Kissan GPT
3D-Printed Public Building In India: देशात पहिल्यांदाच इमारतीचे थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बांधकाम, 8 महिन्यांचे काम अवघ्या ...
  • पिक लागवड, सिचन, किड यावर सल्ला मिळणार

या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिकवर सिंचन, पीक लागवड, कीड नियंत्रण आणि इतर शेतीशी संबंधित विषयांवर योग्य वेळी सल्ला मिळणार आहे. स्मार्टफोन द्वारे शेतकरी चॅटबॉटशी संवाद साधू शकणार आहे. प्रतीक देसाई यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या Kissan GPT च्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्यातील दुरावा कमी होण्यास मदत होईल.

KissanGPT ला याआधीच त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे म्हणने आहे की यामुळे त्यांना पिकांबद्दल योग्य निर्णय घेण्यास आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे.

शेतकऱ्यांना शेतीच्या आव्हानांवर मात करण्यास आणि त्यांच्या शेतात अधिक यश मिळविण्यास मदत करू शकते. भारतातील शेतकरी अधिकाधिक KissanGPT, AI चॅटबॉट कडे वळत आहेत. चॅटबॉट शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com