किरेन रिजिजू म्हणाले.. न्यायाधीशांनी विचारपूर्वक बोलावं'!

न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वय असला पाहिजे, मात्र कोणाच्याही कामात हस्तक्षेप होता कामा नये. कोणावरही टीका करणे योग्य, पण भाषेची मर्यादा लक्षात ठेवावी.
Kiren Rijiju
Kiren RijijuDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायाधीशांबाबत मोठा खुलासा केला आहे. न्यायपालिका, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यातील समन्वयावर बोलताना ते म्हणाले की, न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलले पाहिजे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. न्यायव्यवस्था(Court), विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वय असला पाहिजे, मात्र कोणाच्याही कामात हस्तक्षेप होता कामा नये, असेही ते म्हणाले.

Kiren Rijiju
Haryana: विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी शाळांमध्ये होणार समुपदेशकांची नियुक्ती

रिजिजू म्हणाले की, देशभरातील नागरिकांकडे असलेले मतदार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आहे, जे नागरी हक्क आणि लोकशाहीचे महत्त्व दर्शवते. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम काम केले आहे. ते म्हणाले, 'माझा स्वत:चा गेल्या 7 निवडणुका लढवण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. यामुळेच भारताची लोकशाही मजबूत होते.

न्यायाधीश आणि सहकाऱ्यांना समन्वय साधावा

ते म्हणाले, 'मी सर्वोच्च न्यायालय-उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आणि माझ्या सहकाऱ्यांना सामंजस्याने चालण्यास सांगितले. निवडणूक आयोगाबाबत न्यायमूर्तींनी सावधपणे बोलले पाहीजे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते म्हणाले, 'कायदा सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केले, परंतू मला त्यावर मत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही. येणाऱ्या काही वर्षात आणखी निवडणूक सुधारणा केल्या जातील, असेही किरेन रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले.

कोणावरही टीका करणे ठीक आहे आणि करता येते, पण भाषेची मर्यादा ठेवावी. तो कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो याकडेही न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकजण आपापले काम करत आहे. कठोर टीका करण्यात काही चुकिचे नाही, परंतु चांगल्या कार्यांचे कौतुक देखील केले पाहिजे.

Kiren Rijiju
'वेस्टर्न बायपासच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती करणार'

'आयोगावर टीका योग्य नाही'

किरेन रिजिजू यांनी निवडणूक आयोगाचे (Election Commission) कौतुक करतांना म्हणाले की, 'कोविड-19 दरम्यान निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचे काम केले. त्यांनी लोकशाही व्यवस्थेत अडचण येऊ दिली नाही. आव्हान पेलायचे होते, अशा स्थितीत आयोगावर टीका करणे योग्य नाही. कोरोनाच्या (Covid 19)काळातही निवडणूक आयोगाने चांगल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या आहेत. रिजिजू म्हणाले, ज्यांना लोकशाहीला आव्हान द्यायचे आहे, ते निवडणूक आयोग आणि निवडणुकीलाच आव्हान देऊ लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com